आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maud Griezmann Sister Of French Soccer Star Antoine Griezmann Recalls Terror Of Paris Attacks

भनायक दृश्य: जो कोणी हालेल त्याला गोळी मारत दहशतवादी, मॅच सुरुच होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सचा स्ट्रायकर एंटोनी ग्रिजमॅनची बहिण माउड ग्रिजमॅन, इनसेटमध्ये त्या मॅचमध्ये खेळताना एंटोनी ग्रिजमॅन आणि खाली नीचे (उजवीकडे) दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतरची भयानक स्थिती... - Divya Marathi
फ्रान्सचा स्ट्रायकर एंटोनी ग्रिजमॅनची बहिण माउड ग्रिजमॅन, इनसेटमध्ये त्या मॅचमध्ये खेळताना एंटोनी ग्रिजमॅन आणि खाली नीचे (उजवीकडे) दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतरची भयानक स्थिती...
पॅरिस- फ्रान्सचा स्ट्रायकर एंटोनी ग्रिजमॅन यूरो कप फुटबॉल टूर्नामेंटमध्ये चमकला आहे. त्याची टीम 10 जुलैला होणा-या अंतिम सामन्यात पॅरिसमधील त्या मैदानावर खेळणार आहे जेथे गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यादरम्यान एंटोनी ग्रिजमॅन याच मैदानावर खेळत होता तर, तेथील जवळच असणा-या थिएटरमध्ये त्याची बहिण माउड अडकली होती. ग्रिजमॅनच्या बहिणीला तो हल्ला आजही चांगला आठवतो जो तिने एका इंटरव्यूद्वारे सांगितला. बाहेर गोळ्या झाडल्या जात होत्या, आत सामना सुरु होता...
- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्टेडियमच्या बाहेर अशावेळी हल्ला झाला जेव्हा ग्रिजमॅन मैदानात जर्मनीविरोधात फ्रेंडली मॅच खेळत होता.
- त्याच वेळी त्याची बहिन माउड, बाटाक्लान थिएटरमध्ये म्यूझिक कॉन्सर्ट ऐकायला गेली होती. जेथे ती थोडक्यात बचावली होती.
- हल्ल्याची घटना आठवताना माउड म्हणते, त्यादिवशी मी सकाळी 9 वाजताच बाटाक्लान थिएटरमध्ये पोहचली होती. त्याचवेळी माझ्या भावाचा सामना स्टेट दी फ्रान्स स्टेडियम सुरु होता.
- फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 129 लोक मारले गेले होते. तर 350 हून अधिक लोक जखमी झाले होते.
कॉन्सर्ट सुरु असतानाच झाला होता हल्ला-
- माउडचे म्हणणे आहे की, त्या दिवशी सकाळी 'कॉन्सर्ट सुरु होताच 40 मिनिटांनी थिएटरमध्ये मोठमोठ्या स्फोटाचा आवाज आला. मला वाटले ते म्यूझिक बॅंडचा आवाज आहे.
- मात्र, काही वेळाने मी आणि माझ्या बॉयफ्रेंडने तीन दहशतवाद्यांना हॉलमध्ये घुसताना पाहिले. ते सातत्याने गोळीबार करीत होते.
- 'जो कोणी हालेल त्याला ते गोळी मारत होते. सुमारे 90 मिनिटांनी आम्ही पोलिसाच्या मदतीने बाहेर पडलो.
- 'मी ठीक असल्याचे आईला फोन करून सांगितले मात्र त्याचवेळी समजले की, स्टेडियमच्या बाहेर सुद्धा हल्ला झाला आहे.
भावाने मागितली सोशल मीडियावर मदत
- माउडच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिला स्टेडियमबाहेर हल्ला झाल्याची माहिती तेव्हा ग्रिजमॅनच्या काळजीने त्रस्त झाली. मात्र, या हल्ल्याची माहिती खेळाडू आणि प्रेक्षकांना दिली नव्हती. तसेच सामनाही थांबवला नव्हता.
- 'मॅच संपताच प्रेक्षकांना बाहेर काढण्यात येत होते. ग्रिजमॅनला जसेही थिएटरवर हल्ला झाल्याचे कळले तो फारच चिंता करू लागला.
- 'मात्र, तो सुरक्षा कारणामुळे सर्व खेळाडूंसह स्टेडियममध्ये अडकून पडला. तो माझ्यासाठी मात्र सातत्याने ट्वीट करू लागला.
- 'माझा फोटो शेअर केला. तसेच माझी बहिण थिएटरमध्ये आहे तिला शोधण्यासाठी मदत करा असे टि्वट केले. मी त्यावेळी त्याला टि्वट करून मी ठीक असल्याचे कळविले. त्यानंतर त्याने सुटकेचा निश्वास टाकला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यानंतर कशी होती पॅरिसमधील स्थिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...