भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान अमेरिकेत झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा अष्टपैलू अस्टिअर्ट बिन्नीने एकाच षटकात 32 धावा दिल्या होत्या. हा सामना भारत केवळ 1 धावेने हरला होता. त्यानंतर सोशल मिडियात स्टुअर्ट बिन्नीची जोरदार खिल्ली उडविण्यात आली. बिन्नीसोबत त्याची पत्नी मयंती लॅंगर हिच्यावरही ट्रोलर्सनी निशाणा साधला.
टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागताच क्रिकेटप्रेमींनी या पराभवाचे खापर भारतीय गोलंदाज स्टुअर्ट बिन्नीच्या डोक्यावर फोडले होते. स्टुअर्ट व मयंतीवर वाईट कमेंटस पास होताच यामुळे वैतागलेली मयंती अखेर पुढे आली आहे. तिने याबाबत टि्वटर आणि इंस्टाग्रामवरून युजर्सना सुनावले आहे.
काय म्हणाली, मयंती....
- मयंतीने ट्रोलर्सना एक पत्र लिहून पोस्ट केले आहे की, मला आशा आहे की
आपल्या जवळच्या लोकांबाबत तुम्ही मृत्यू कधीच मागणार नाही.
- मयंती पुढे म्हणते, 'एखाद्याला आत्महत्या करायला लावणे हे लाज आणणारे आहे. एकदा अशा कुटुंबांबाबत विचार करा ज्यांच्या घरात अशी घटना घडली आहे. आपण त्यांच्या दुर्दशेची चेष्टा केली आहे.
- 'मला आशा आहे तुम्हाला प्रेम व चांगली वागणूक मिळेल. घटस्फोटाचा सल्ला देणा-यांना सांगू इच्छिते की ते तुमच्या हातात नाही.'
- मी जेव्हा 18 वर्षाची आहे तेव्हापासून काम करीत आहे. मला पैशासाठी लालची महिला म्हणून आपला वेळ खराब करण्यापेक्षा नोकरी करा व आपले व आपल्या कुटुंबांचे भले करा.
- ती पुढे म्हणते, मला आशा आहे की, आमची चेष्टा करून तुम्हाला आनंद मिळाला असेल. पण खरेच याचा या गोष्टीशी काही संबंध आहे का.'
- शेवटी तिने ट्रोल करणा-यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बिन्नीलाच का केले टार्गेट...?
- वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरु होती तेव्हा स्टुअर्ट बिन्नीने 11 वे षटक टाकले.
- बिन्नीच्या या षटकात वेस्ट इंडीजचा फलंदाज इविन लुईस याने सलग 5 षटकार लगावले.
- बिन्नीने एका या षटकात एकूण 32 धावा दिल्या. बिन्नी हा टीम इंडियासाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
- क्रिकेटप्रेेमींंनी बिन्नीला टीम इंडियाच्या पराभााचा व्हिलन समजून त्याच्यावर कडाडून टीका केली. इतकेेच नव्हे तर त्याच्या पत्नीवरही निशाणा साधला.
काय आल्या होत्या कमेंट्स
- एक यूजरने ट्वीट केले की, 'मॅच सुरु होण्यास यामुळे उशिरा झाला, कारण वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी बिन्नीला संघात न घेतल्याने धरणे आंदोलन करीत होते.
- मॅच सुरु होण्यास पावसामुळे उशिर झाल्यानंतर एका यूजरने लिहले, हा पाऊस नाही तर ते स्टुअर्ट बिन्नीचे अश्रू आहेत'
- एका यूजरने ट्वीट केले, 'पहिल्या मॅचनंतर धोनीने संघात एक बदल केला तर लगेच वेस्ट इंडिजचा पूर्ण स्कोर (245 वरून 143) असा बदलला.'
- 'वेस्ट इंडिजची 143 धावावर ऑलआउट झाली. त्यांनी पटापट बाद होऊन स्टुअर्ट बिन्नीला न खेळविण्याचा विरोध केला.'
- मॅच रद्द झाल्याबाबत एकाने लिहले, 'स्टुअर्ट बिन्नीने साबित केले की जर मला खेळविणार नसाल तर सामना पूर्ण होऊ देणार नाही.'
- एकाने लिहले 'जेव्हा धोनी रेल्वे टीसी होता तेव्हा बिन्नी पाणी विकायचा. तेव्हा धोनीने त्याला म्हटले होते की, मला पाणी पाजले आता टीमला कधी पाणी पाजणार.'
- एकाने लिहले, 'आता माहित झाले स्टुअर्ट बिन्नी इतका बिचारा का आहे. कारण त्याच्या नावाची इनिशियल्स S आणि B आहेत. जी 'S'tuart Broad आणि 'B'en Stokes शी मिळतात.
- एका यूजरने ट्वीट केले की, स्टुअर्ट बिन्नी स्पोर्ट्समधील आरक्षण हे जीते जागते उदाहरण आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्टुअर्ट बिन्नी याच्याबाबत सोशल मीडियात आलेल्या फनी कमेंट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)