आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीएची सीसीआयला नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या 28 मे रोजी आयपीएल प्लेऑफ सामना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय आयोजित करणार्‍या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला (सीसीआय) मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आयपीएल प्लेऑफ सामना बीसीसीआयने थेट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पूर्वपरवानगीशिवाय सीसीआयला बहाल केला होता. त्या वेळीही एमसीएने सीसीआयला जाब विचारला होता. त्या पत्रालाही सीसीआयने उत्तर देण्याचे टाळले होते.

मुंबई, ठाणे या दोन जिल्ह्यांमधील क्रिकेट आयोजन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिपत्याखाली होत असते. त्यामुळे एमसीएच्या परवानगीशिवाय बीसीसीआयच्या दडपशाहीमुळे सामना आयोजित करण्याचे धारिष्ट्य दाखवणार्‍या सीसीआयला जाब विचारला आहे.

सीसीआय ही संघटना मुंबई क्रिकेट असोसिएशनला संलग्नदेखील नाही. तरीही क्रिकेटच्या विकासासाठी एमसीएने आजतागायत या संस्थेचा संघ स्थानिक क्रिकेटमध्ये खेळवण्याची परवानगी दिली होती. तसेच या संस्थेला स्पर्धांचे आयोजन करण्याचीही परवानगी दिली होती.

बीसीसीआयच्या कारभारावर पवारांची टीका
एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी बीसीसीआयच्या कारभारावर थेट टीका केली होती. त्यानंतर बीसीसीआयने वानखेडेवरील अंतिम सामना बंगळुरूला हलवला. एक प्लेऑफ सामना सीसीआयला देऊन एमसीएला दुखावले होते. सीसीआयने त्या वेळी एमसीएबद्दल अपशब्दही वापरले होते. त्यामुळे अखेर एमसीएने नोटीस पाठवली आहे