आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीएने रत्नाकर शेट्टी यांना दिली बाजू मांडण्याची संधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एमसीएने रत्नाकर शेट्टी यांना मंगळवारी आपली बाजू मांडण्याची संधी दिली. त्यांनी सर्वसाधारण सभेत तिकिटांचा काळाबाजार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांना खुलासा करावा लागणार आहे. आपण असे काही आरोप केले नसल्याचा यू टर्न त्यांनी घेतला. मात्र, शेट्टी यांनी आरोप केल्याचे स्पष्ट करणारी ध्वनिफीत उपलब्ध असल्याचा दावा कार्यकारिणीने केला आहे. कार्यकारिणीची बदनामी केल्याबद्दल रत्नाकर शेट्टी यांच्यावर 3 ते 5 वर्षे असोसिएशनच्या कामकाजापासून दूर ठेवण्याची कारवाई होऊ शकते. तसेच कारवाईची ही टांगती तलवार टाळायची असल्यास शेट्टी यांना विल्सन महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व सोडावे लागेल, अशी सूत्रांनी माहिती दिली.