आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MCA To Discuss Proposal To Name Wankhede Commentators' Box After Bal Thackeray

वानखेडे स्टेडियमवरील समालोचन कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वानखेडे स्टेडियमवरील समालोचन कक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीकडे आला आहे. मंगळवारी होणार्‍या कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा विषय नाही. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार असून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव अवधी उपलब्ध असल्यासच चर्चेला येईल. कार्यकारिणीवर वार्षिक सर्वसाधारण सभेत तिकिटांचा काळाबाजार करण्याचा आरोप करणारे रत्नाकर शेट्टी यांच्यावरील कारवाईच्या संदर्भात चर्चा होणार असल्याचे कळते.

शेट्टी यांना असोसिएशनने त्या आरोपांबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यावर शेट्टी यांनी आपण तसे थेट आरोप कुणाही कार्यकारिणी सदस्यावर केले नाहीत, असे उत्तर दिले होते. मात्र, त्या सभेची ध्वनिफीत कार्यकारिणीकडे उपलब्ध असून त्यामध्ये शेट्टी यांनी आरोप केल्याचे स्पष्ट आहे, असे कार्यकारिणीचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकारिणीची बदनामी केल्याबद्दल रत्नाकर शेट्टी यांच्यावर 3 ते 5 वर्षे असोसिएशनच्या कामकाजापासून त्यांना दूर ठेवण्याची कारवाई होऊ शकते.