Home | Sports | From The Field | mcgrath foresees team india's whitewash

ऑस्‍ट्रेलिया भारताला 4-0 व्‍हाईटवॉश देईलः ग्‍लेन मॅकग्राचे भाकीत

वृत्तसंस्‍था | Update - Jan 02, 2012, 01:47 PM IST

जेम्स पॅटिन्सनसारख्‍या गोलंदाजापुढे भारताची दाणादाण उडेल असे त्‍याने सांगितले.

  • mcgrath foresees team india's whitewash

    सिडनी - विद्यामान मालिकेमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाचा संघ भारताला 4-0 असा व्‍हाईटवॉश देईल, असे भाकीत ऑस्‍ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्‍लेन मॅकग्रा याने वर्तविले आहे. मॅकग्राने ऑस्‍ट्रेलियाच्‍या युवा गोलंदाजांवर स्‍तुतिसुमने उधळली. जेम्स पॅटिन्सनसारख्‍या गोलंदाजापुढे भारताची दाणादाण उडेल असे त्‍याने सांगितले.
    ग्लेन मॅकग्रा याने सिडनी मैदानावर ही भविष्यवाणी वर्तविली. मॅकग्रा म्हणाला, रविवारी मी ऑस्ट्रेलिया ही मालिका ३-० अशी जिंकेल असे म्हटले होते. मात्र, मला माहित नव्हते की ही चार सामन्यांची मालिका आहे. ऑस्ट्रेलिया भारताला मालिकेत व्हाईटवॉश देईल. ऑस्ट्रेलिया संघातील युवा गोलंदाजांनी मला प्रभावित केले आहे. ते पुढील कसोटी सामन्यांमध्येही चांगली कामगिरी करीत राहतील. जेम्सची गोलंदाजी खैली प्रभावित करणारी आहे. उंची, ताकद त्याच्या जमेच्या बाजू आहेत. भारतीय फलंदाजांकडे या गोलंदाजीला उत्तर नसल्‍याचेही मॅकग्रा म्‍हणाला. सिडनी कसोटी ऑस्‍ट्रेलियाने 4 वेगवान गोलंदाजांना खेळविण्‍यास काहीच हरकत नसल्‍याचे तो म्‍हणाला. सिडनीतील अतिरिक्त स्विंग आणि उसळी ऑस्‍ट्रेलियन गोलंदाजांसाठी जास्‍त फायदेशीर असल्‍याचेही मॅकग्राने सांगितले.

Trending