आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Md Azharuddin Express Desire Of Become Indian Cricket Team Coach

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्‍याची अझरूद्दीनची इच्‍छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- माजी कर्णधार मोहम्‍मद अझरूद्दीनने भविष्‍यात भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक बनण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जर याबाबत विचारणा केली तर टीमबरोबर येण्‍यास मी तयार असल्‍याचे त्‍याने म्‍हटले आहे.

'मी जेवढे क्रिकेट खेळलो आहे, त्‍यातून खूप काही शिकलोय आणि माझे हेच कौशल्‍य मी युवा खेळाडूंना देऊ इच्छितो. माझा कसा उपयोग करायचा हे संपूर्णपणे बीसीसीआयवर अवलंबून आहे. पण मला निश्‍चितपणे भारतीय क्रिकेटशी संलग्नित व्‍हायचे आहे,' असे तो म्‍हणाला.

लंडन स्‍कूल ऑफ इकॉनॉमिक्‍सच्‍या वार्षिक कार्यक्रमाअंतर्गत भारत-पाकिस्‍तानच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये लॉर्ड्स स्‍टेडिअमवर झालेल्‍या मैत्री सामन्‍यात प्रमुख पाहुणा म्‍हणून तो आला होता. 'भारतीय क्रिकेट टीमच्‍या प्रशिक्षकाबाबत निर्णय घेण्‍याचा अधिकार मंडळाला आहे. मात्र, टीमच्‍या फायद्यासाठी मी कोणतीही भूमिका निभावण्‍यास उपलब्‍ध असल्‍याचे त्‍याने सांगितले.

गेल्‍यावर्षी नोव्‍हेंबर महिन्‍यात आंध्रप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने बीसीसीआयद्वारे त्‍याच्‍यावर मॅचफिक्सिंगमुळे लादण्‍यात आलेली आजीवन बंदी उठवली होती.