हाफिझच्या शतकाने पाकची / हाफिझच्या शतकाने पाकची आघाडी

वृत्तसंस्था

Dec 11,2011 01:30:37 AM IST

चितगाव- सलामी कसोटीच्या पहिल्या डावात बांगला देशला 135 धावांवर गुंडाळणा-या पाकने हाफिझ (143) व युनूस (96) व शफिक (40) या जोडीच्या बळावर 4 बाद 415 धावांची खेळी केली. पहिल्या डावात मैदानावरआव्हान टिकून शतकी भागीदारी करणा-या युनूस व शफिकच्या खेळीतून पाकने 280 धावांची आघाडी मिळवली आहे. मोठ्या धावसंख्येसाठी प्रयत्नशील असलेल्या पाकच्या हाफिझ व मिसबाह या जोडीला इलियस सनीने बाद करून बांगलदेशला महत्त्वाचे योगदान दिले. चितगाव येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पाकने पहिल्या डावात बांगलादेशला 135 धावांवर मैदान सोडण्यास भाग पाडले. दीड शतकी भागीदारीच्या खेळीतून पाकच्या तौफिक व हाफिझ या दुस-या दिवशीच्या डावाला सुरुवात केली. मात्र, या वेळी उमरला फार काळ मैदानावर आव्हान राखता आले नाही.
61 धावांची खेळी करणा-या उमरची सकाळच्या सत्रात विकेट पडली. त्यापाठोपाठ अझर अली हा 26 धावा काढून तंबूत परतला. मात्र त्याने हाफिझसोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर युनूसने हाफिझला महत्त्वाची साथ दिली. दरम्यान, दीडशतकाच्या वाटेवर असलेल्या हाफिझची 143 धावांवर सनीने विकेट काढली.

X
COMMENT