आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Media Consantrate On Australian Player Nathan Leon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू नॅथन लिओनवर माध्‍यमांची भुरळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत चार विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लिओन चर्चेत आला आहे. त्याचे ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनीही मनसोक्त कौतुक केले.


चौथी कसोटी ड्रॉ करण्याचे लक्ष्य समोर ठेवून खेळणा-या ऑस्ट्रेलिया टीमने यजमान इंग्लंडच्या नऊ विकेट 238 धावांवर घेतल्या. यामध्ये लिओनने 42 धावा देऊन शानदार चार विकेट घेतल्या. ‘चांगल्या कामगिरीशिवाय संघातील स्थान सुरक्षित नाही हे स्वत: लिओनला माहीत आहे. त्याला संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी मेहनत करावी लागेल, असे डेली टेलिग्राफने म्हटले आहे. तसेच निवड समितीने यापुढेही त्याच्यावर विश्वास ठेवला तर संघाला एक चांगला फिरकीपटू मिळू शकतो, असा विश्वासही टेलिग्राफने व्यक्त केला.