आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Cricketer Rohit Sharma's Would Be Wife Ritika Sajdeh In Photos

PHOTOS : ही आहे रोहितची होणारी Wife, विराटशी जोडले गेले आहे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीबरोबर रितिका (वर), युवराज सिंहबरोबर खाली. - Divya Marathi
विराट कोहलीबरोबर रितिका (वर), युवराज सिंहबरोबर खाली.
टीम इंडियाचा आणखी एक बॅचलर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. तो म्हणजे स्टार फलंदाज रोहित शर्मा. वाढदिवसानंतर काही दिवसांनीच रोहितने रितिकाशी साखरपुडा केल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे ही रितिका म्हणजे कोण हीच उत्सुकता प्रत्येकाला आहे. हे दोघे कधी भेटले, विवाह कधी करणार असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. पण अद्याप हे दोघे लग्न करणार असल्याचे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. रोहितने साखरपुड्याला ट्वीटरद्वारे दुजोरा दिला.

कोण आहे रितिका सजदेह
28 वर्षीय रितिका व्यवसायाने स्पोर्टस् मॅनेजर आहे. रोहित आणि तिची 6 महिन्यांपासून ओळख आहे. रोहितनेही चांगल्या मैत्रीनंतर आता जीवनसाथी बनण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. रितिकाला रोहितने बोरीवलीच्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रपोज केले. याच ठिकाणी रोहितने 11 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.

विराटशी जोडले गेले होते नाव, युवीला मानते भाऊ
स्पोर्टस् मॅनेजर असल्याने रितिका अनेक क्रिकेटपटुंना ओळखते. विराट कोहली आणि युवराजबरोबर तिचे चांगले रिलेशन आहे. ऑगस्ट 2013 मध्ये ती विराट कोहलीबरोबर मुंबईत एका मुव्ही डेटवरही स्पॉट झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी भारतीय टीम झिम्बाब्वे टूरहून परतली होती. पण दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. युवराजबरोबरही तिचे बरेच जुने नाते आहे. ती युवीला भाऊ मानते आणि राखीही बांधते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रितिका सजदेहचे Photo's