आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या कोचचा शोध; प्रवीण आमरेचे नाव आघाडीवर, २६ एप्रिलला बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचा माजी कसोटीपटू आणि मुंबई रणजी संघाचा अलीकडचा प्रशिक्षक प्रवीण अामरे याच्या नावाची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी जोरदार चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २६ एप्रिल रोजी बीसीसीआयच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत ‘टीम इंडिया’च्या प्रशिक्षकपदासाठीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा होणार आहे. त्यामध्ये प्रवीण अामरे याचे नाव आघाडीवर असल्याचे कळते.

बीसीसीआयने अलीकडेच डंकन फ्लेचर यांच्या साथीला भारतीय क्रिकेट प्रशिक्षक सहकारी म्हणून नियुक्त केले होते. संजय बांगर फलंदाजीचा प्रशिक्षक, भरत अरुण गोलंदाजीचा प्रशिक्षक आणि श्रीधर क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक, असे तीन सहायक प्रशिक्षक गतवर्षी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांच्या फेरनियुक्तीबाबतही चर्चा होईल. नव्या उमेदवारांच्या नावाचीही कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा होणार असून त्यामध्ये प्रवीण अामरेच्या नावाचा समावेश आहे.

परदेशी प्रशिक्षकांच्या नामावलीमध्ये न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग, ऑस्ट्रेलियाचा मायकल हसी व अन्य उमेदवारांचा समावेश आहे. त्यांना सहकारी प्रशिक्षक म्हणून भारतीयांची निवड केली जाते. त्यासाठी प्रवीण आमरेचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. प्रवीण अामरे सध्या दिल्ली संघाचा प्रशिक्षक असून याआधी सहारा व मुंबई इंडियन्सचेही प्रशिक्षकपद त्याने भूषवले होते.

रवी शास्त्रीचा कल समालोचनाकडे
रवी शास्त्रीनेही भारतीय संघाच्या प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका विश्वचषक स्पर्धेपर्यंतच स्वीकारली होती. क्रिकेट समालोचन हे त्याचे प्रथम पसंतीचे क्षेत्र असल्यामुळे रवी शास्त्रीनेही आपला कल कोठे आहे ते स्पष्ट केले आहे. त्यामुळे डंकन फ्लेचर यांच्या जागी कुणाची निवड करायची हा गहन प्रश्न बीसीसीआयला सोडवावा लागणार आहे.