आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL FIXING : चेन्नई आणि राजस्थानचा संघ आयपीएलमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - राजस्थान रॉयल्सचे को ओनर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी. - Divya Marathi
फोटो - राजस्थान रॉयल्सचे को ओनर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी.
नवी दिल्ली - 2013 मध्ये झालेल्या आयपीएलच्या सातव्या पर्वातील SPOT FIXING स्कँडलमध्ये गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांचा बेटिंगमध्ये समावेश होता, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. मात्र, श्रीनिवासन यांच्या विरोधात सबळ पुरावे नसल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तसेच चेन्नई आणि राजस्थानचे संघ आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
बीसीसीआयच्या स्पर्धा या सार्वजनिक स्तरावर होत असून सामान्य लोकांप्रमाणे त्यांनाही कायदा लागू होतो, अशा शब्दांत यावेळी सुप्रीम कोर्टाने BCCI ला फटकारले आहे. मात्र, त्याचवेळी या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान गेल्यावर्षी बीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन.श्रीनिवास यांना कोर्टाने पदावरून पायउतार केले होते. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी जस्टीस मुदगल समितीची स्थापना करण्यात आली होती.

दिलासा आणि दणका
सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना मोठा धक्का दिला आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात सिद्ध होत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मात्र त्याचवेळी कोर्टाने श्रीनिवासन यांना दणकाही दिला आहे. श्रीनिवासन टीमची मालकी स्वतःकडे ठेवू शकतात. पण त्यांना त्यासाठी बीसीसीआय किंवा टीम यापैकी एकाची निवड करावी लागेल असे कोर्टाने म्हटले आहे. IPL चे सीओओ सुंदर रमन विरोधात चौकशी करण्याची गरज असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या 130 पानी निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे
- श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को ओनर राज कुंद्रा टीमचे अधिकारी आहेत.
- श्रीनिवासन यांच्या विरोधात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध होत नाही.
- चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आयपीएलमधून सस्पेंड. कोर्टाने बीसीसीआयला तीन सदस्यीय रिपोर्ट कमिटी तयार करण्याची सूचना केली. तीन सदस्यांची ही ज्युरी या संघांचे भवितव्य ठरवेल.
- बीसीसीआयच्या निवडणुका 6 आठवड्यांत घेण्याचे निर्देश. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास श्रीनिवासन यांना मज्जाव.
- श्रीनिवासन यांना बीसीसीआय आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल.
- कोर्टाच्या मते, आयपीएलचे सीओओ सुंदर रमन यांच्या विरोधात चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
- बीसीसीआय स्वायत्त संस्था असली तरी त्याची कार्यप्रणाली सार्वजनिक आहे.
- मुदगल कमिटीने सर्व नियमांचे पालन केले. कुंद्राच्या विरोधात सर्व आरोप सिद्ध झाले.
- मुदगल कमिटीच्या निष्कर्षांचे पुनरावलोकन करण्याची गरज नसल्याचे कोर्टाने मान्य केले.
- राज कुंद्रा यांचे म्हणणे मुदगल कमिटीने ऐकले होते. त्यामुळे ते तक्रार करू शकणार नाहीत.
- श्रीनिवासनयांचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयपीएल फ्रँचायचीचे मालक असणे हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा प्रकार आहे.
- बीसीसीआयचा कोणताही अधिकारी व्यावसायिक बाबींत सहभागी होऊ शकत नाही.
- ज्या नियमामुळे श्रीनिवासन टीमचे मालक बनले तो नियमच या सर्व प्रकरणात मुख्य व्हिलन ठरला आहे.
- केवळ खेळाडूच नाही तर अधिकारी आणि फ्रँचायजींनाही त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेल.
- सुप्रीम कोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश आर.एम.लोढ़ा यांच्या नेतृत्त्वात एक तीन सदस्यीय पॅनल तयार करण्यात येईल. ते मयप्पन आणि कुंद्रा यांच्या शिक्षेचा कालावधी ठरवेल.
- बीसीसीआयने IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी नियमानुसार केली नाही.
- श्रीनिवासन आणि त्यांचे कुटुंब इंडिया सिमेंट्स कंपनीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर संलग्न आहे. त्यामुळे या कंपनीत आपली नामामात्र भागीदारी असल्याचे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे.
- गैरव्यवहाराला पाठिशी घालून विश्वसनीयता गमावण्यास बीसीसीआय तयार आहे का?
- खेळात जोपर्यंत विश्वसनीयता टिकून आहे, तोपर्यंतच तो खेळ असतो.
- बीसीसीआयच्या कायद्यांमधील बदलांमुळे श्रीनिवासन यांना IPL टीमचे मालक बनण्यास मदत झाली.
- चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांचे भवितव्य स्वतंत्र समिती ठरवेल. कारवाई करण्याचा अधिकार बीसीसीआयचा आहे, पण या प्रकरणी निर्णय बीसीसीआयकडे सोपवला जाऊ शकत नाही.
पुढे वाचा, न्यायालयाने आदेश ठेवला होता राखीव...