आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meiyappan Provided Inside Information To Bookies During IPL 6

आयपीएल-6 मधील निम्मे सामने होते फिक्स, मयप्पन सट्टेबाजांना पुरवायचा गोपनिय माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगमधील 'मास्टर गुरु' मयप्पन हाच बुकींना गोपनिय माहिती पुरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चौकशी करणाऱ्या न्या. मुद्गल समितीने हा खळबळजनक खुलासा केला आहे.

न्या. मुद्गल समितीच्या अहवालानुसार, मयप्पन मोबाइल क्रमांक 9677219984 आणि आयपॅडच्या माध्यमातून वीरेंद्र रंधावा ऊर्फ विंदू दारा सिंग याच्या संपर्कात होता. या माध्यमातून तो गोपनिय माहितीही शेअर करत होता. दोघांच्या संभाषणाचा संपूर्ण तपशील चौकशी समितीकडे आहे. मयप्पन याने विंदूच्या मदतीने आयपीएल- 6 मध्ये सट्टा लावला होता. यात सीएसके, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सामन्यांचा समावेश आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, आयपीएल-6 मधील जवळपास निम्मे सामने होते फिक्स...