आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meiyappan, Vindoo\'s Bail Pleas To Be Decided Tomorrow

मयप्‍पन-विंदूला 14 जूनपर्यंत न्‍यायालयीन कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चेन्‍नई सुपरकिंग्‍ज टीमचे प्रिन्सिपल मयप्‍पन, अभिनेता विंदू रंधवा आणि इतर दोघांना पोलिस कोठडी देण्‍याची मुंबई गुन्‍हे शाखेची मागणी फेटाळत कोर्टाने त्‍यांना 14 जूनपर्यंत न्‍यायालयीन कोठडी सुनावली आहे. मयप्‍पन, विंदू आणि इतर दोन आरोपींना आयपीएलमध्‍ये सट्टेबाजी केल्‍याप्रकरणी अटक करण्‍यात आली आहे.

या सगळयांना आता पोलिस कोठडी देण्‍यात कुठलाच अर्थ नसल्‍याचे कोर्टाने म्‍हटले आहे. कोर्टाने मयप्‍पन, विंदू, अल्‍पेश कुमार पटेल, एका हवाला चालक आणि सट्टेबाजांचा साथीदार प्रेम तनेजाला 14 जूनपर्यंत न्‍यायालयीन कोठडीत ठेवण्‍याचा आदेश देण्‍यात आला.

मयप्‍पन यांना आयपीएलमधील सट्टेबाजी प्रकरणी गेल्‍या 25 मे रोजी रात्री अटक केली होती. सट्टेबाजीप्रकरणी अटकेत असलेल्‍या विंदूने चौकशीदरम्‍यान मयप्‍पन यांचे नाव घेतले होते.