आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Messi, Ronaldo Hattrick In La Liga Football Competition

ला लिगा फुटबॉल स्पर्धेत मेसी, रोनाल्डो हॅट‌्ट्रिकचे बादशहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - ला लिगा स्पर्धेत लिओनेल मेस्सीने केलेल्या हॅट्ट्रीकमुळे एस्पॅन्योल संघाविरुद्ध खेळताना बार्सिलोनाने ५ विरुद्ध १ असा विजय मिळवला. या विजयामुळे बार्सिलोनाचा संघ अव्वल स्थानावर असलेल्या रिअल माद्रिदच्या अधिक जवळ पोहोचल्याने माद्रिदला आता प्रथम स्थान कायम राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

मेसीची ही कारकीर्दीतील २१ वी हॅट्ट्रीक असून या कामगिरीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. रोनाल्डोने गत आठवड्यात २३ वी हॅट्ट्रीक नोंदवत सर्वाधिक हॅट्ट्रीकचा मान पटकावलेला आहे. प्रारंभी एस्पॅन्योलने गोल करीत आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर मेसीने खेळाची सूत्रे हातात घेऊन केलेल्या दमदार कामगिरीमुळेच बार्सिलोनाला हा विजय साकारता आला. या सामन्यानंतर आता रिअल माद्रिदपाठोपाठ अ‍ॅटलेटिको माद्रिद दुस-या स्थानी तर बार्सिलोना तिस-या स्थानावर आहे.

रोनाल्डोची २३ वी हॅट्ट्रीक
स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने स्पॅनिश लीग ला लीगामध्ये २३ वी हॅट्ट्रीक करताना आपला २०० वा गोल करून नवा विक्रम केला. त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे रिअल माद्रिदने सेल्टा विगोला ३-० ने हरवले. या सामन्यात दोन रेकॉर्ड बनले. रिअल माद्रिदने सलग १८ विजयांच्या बार्सिलोनाच्या क्लब रेकॉर्डची बरोबरी केली. यानंतर रोनाल्डोने टेल्मो जारा आणि अलफ्रेडो डी स्टेफानो यांच्या २२ हॅट्ट्रीकच्या विक्रमाला मोडले. रोनाल्डोने नवव्या मिनिटाला कॉर्नरवर पहिला, ६५ व्या मिनिटाला पेनॉल्टीवर दुसरा ता ८१ व्या मिनिटाला तिसरा गोल केला. रिअल माद्रिदचे १४ सामन्यांत ३६ गुण झाले आहेत.

त्याने आम्हाला खूप काही दिले
लिओनेल मेसीने खेळाचा स्तर इतका उंचावला की त्याची तुलनाच करता येत नाही. त्याने आमच्या संघाला इतके काही दिले आहे की ते शब्दात सांगणे अशक्य आहे.
गेरार्ड पीक, बार्सिलोनाचे प्रशिक्षक