आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल नदाल, फेरर सेमीफायनलमध्ये; लियोनार्डो पराभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी- जगातील माजी नंबर वन खेळाडू आणि 11 वेळचा ग्रॅँडस्लॅम विजेता राफेल नदाल आणि अव्वल मानांकित डेव्हिड फेररने मेक्सिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
गुडघ्याच्या दुखापतीने गेल्या सात महिन्यांपासून त्रस्त असलेल्या नदालने दमदार पुनरागमन केले. गेल्या चार आठवड्यांत त्याने सलग तिसºया टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला. नदालने सुरेख कामगिरी करत अर्जेंटिनाच्या लियोनार्डाे मेयरला 6-1, 7-5 ने पराभूत केले. या विजयासह त्याने सेमीफायनलमधील प्रवेशही निश्चित केला. त्याचा उपांत्य सामना निकोलस अलमार्गोसोबत होईल.
तीन वेळचा चॅम्पियन डेव्हिड फेररने उपांत्यपूर्व लढतीत इटलीच्या पाओलो लोरेंजीला 6-3, 6-1 ने अशा फरकाने धूळ चारली.