आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Chopra Signed Up By Sachin Tendulkar For Kerala Blasters

सचिनच्‍या संघात \'विक्रमवीर\' खेळाडू, मैदानावर उतरातच 15 व्‍या सेकंदाला केला होता गोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - मायकल चोप्रा)
मुंबई - भारतामध्‍ये लवकर फुटबॉल स्‍पर्धांचे पडघम वाजणार आहे. आयपीएलच्‍या धर्तीवर इंडियन सुपर लीग (आयएसएल) ही स्‍पर्धा सुरु होणार आहे. त्‍यामध्‍ये 'केरला ब्‍लार्स्‍टस' हा सचिन तेंडुलकरचा संघ आहे. सचिनच्‍या संघात एका 'विक्रमवीरा'चा समावेश आहे. ज्‍याने मैदानावर उतरताच केवळ 15 व्‍या सेकंदाला गोल नोंदवला होता.
मूळ भारतीय वंशाचा असलेला ब्रिटिश फुटबॉलपटू मायकल चोप्राने 2006 मध्‍ये हा विक्रम केला होता. केरला ब्‍लास्‍टर्स सोबत मायकल चोप्राचा करार झाला असून चोप्रा सचिनने खरेदी केल्‍याने खूप आनंदी असल्‍याचे केरला ब्‍लास्‍टर्सच्‍या व्‍यवस्‍थापकांनी सांगितले.
35 लाख रुपयांना केले खरेदी
मायकल चोप्राला 35 लाख रुपये (58158 यूएस डॉलर) ला खरेदी करण्यात आले.
पूर्वी न्यूकॅसल युनायटेड आणि त्यानंतर ब्लॅकपूल क्लबचा सदस्य म्हणून मायकल चोप्राने योगदान दिलेले आहे. त्‍याने आतापर्यंत 310 सामने खेळले असून त्‍यामध्‍ये 105 गोल केले आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, चोप्रावर का लागला होता प्रतिबंध