Home | Sports | From The Field | michael clarke waits for punter's hunderd at scg

क्‍लार्कला सचिनच्‍या नव्‍हे तर पन्‍टरच्‍या शतकाची प्रतिक्षा

वृत्तसंस्‍था | Update - Jan 02, 2012, 11:02 AM IST

सिडनीच्‍या मैदानावर सचिनऐवजी पॉन्‍टींगने शतक ठोकले तर नवल वाटणार नाही, असे क्‍लार्क म्‍हणाला.

  • michael clarke waits for punter's hunderd at scg

    सिडनीः सचिन तेंडुलकरच्‍या शंभराव्‍या आंतरराष्‍ट्रीय शतकाची सर्वांना प्रतिक्षा आहे. परंतु, ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्‍लार्कला सचिनच्‍या नव्‍हे तर रिकी पॉन्‍टींगच्‍या शतकाची प्रतिक्षा आहे. सिडनीच्‍या मैदानावर सचिनऐवजी पॉन्‍टींगने शतक ठोकले तर नवल वाटणार नाही, असे क्‍लार्क म्‍हणाला.
    सिडनीच्‍या मैदानावर मंगळवारपासून दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. या सामन्‍यात 'पन्‍टर'ने शतक ठोकले पाहिजे, असे क्‍लार्कला वाटते. तो म्‍हणाला, पन्‍टर सध्‍या खुप चांगला खेळत आहे. त्‍याच्‍याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. शतक पूर्ण केल्‍यास कोणीही थांबवू शकणार नाही. सिडनीच्‍या मैदानावर खेळणे त्‍यालाही आवडते. त्‍यामुळे तोच शतक ठोकणार असल्‍याचे क्‍लार्क म्‍हणाला.
    पॉन्‍टींगने गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये एकही शतक ठोकलेले नाही. शेवटचे शतक त्‍याने पाकिस्‍तानविरुद्ध होबार्ट येथे ठोकले होते. त्‍याच्‍या नावावर 39 कसोटी शतके आहेत. सिडनीवरही त्‍याचे प्रदर्शन चांगले आहे. या ठिकाणी 15 कसोटींमध्‍ये त्‍याने 5 शतकांसह 1346 धावा काढल्‍या आहेत.

Trending