आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Hussey Is First Choice Of MS Dhoni For Coach Then Sachin, Dravid, Ganguly

सचिन-द्रविड़-गांगुली सोडून 'अनुभवहीन' हसी ला कोच बनवू इच्छितो धोनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी – विश्‍वचषक 2015 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा करार संपुष्‍टात येणार आहे. त्‍यांच्‍या जागी राहूल द्रविड, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांना सोडून अनुभवहीन हसीला घेण्‍याबद्दल धोनीने बीसीसीआयला सुचविले आहे.
हसीच का ?
भारताकडे जगद्विख्‍यात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड सारखे माजी खेळाडू असतानाही धोनीने माइक हसीचे नाव सुचविले. कारण धोनी आणि हसी चांगले मित्र आहेत. शिवाय दोघेही आयपीएलमध्‍ये चेन्‍नई सुपर किंग्‍जकडून खेळले आहेत. गॅरी कर्स्‍टनप्रमाणेच हसीची कारकीर्द राहिल असे धोनीला वाटते.
हसी भारतात ठरु शकतो फेल
मायकल हसीकडे कोचिंगचा अनुभव नाही. त्‍याने कधी आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर कधी संघाचे नेतृत्‍व केले नाही. ज्‍यामुळे कर्णधाराला तो रणनिती बनविण्‍यात मदत करेल. यापूर्वी ऑस्‍ट्रेलियाच्‍या ग्रेग चॅपेल यांना कोच म्‍हणून घेण्‍याचे सौरव गांगुलीने सुचविले होते. चॅपेल-गांगुली वाद सर्वश्रूत आहे.
मुरली विजयला केली मदत
ऑस्ट्रेलियात मुरली विजयला मिळत असलेल्या यशामध्ये हसीचा मोलाचा वाटा आहे. यामुळे धोनीने हसीचे नाव सुचविल्याचे, सांगण्यात येत आहे. आता पाहण्‍यालायक हे ठरेल की, बीसीसीआय धोनीचे ऐकतो की नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सचिन, द्रविड आणि गांगुली यांच्‍या बाबतील हसीचे क्रिकेट करियर...