आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Michael Hussy Coaching To South Africa Team In World Cup 2015 Hussy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WC-2015 : दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक जिंकून देणार हा ऑस्‍ट्रेलियन खेळाडू ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 फेब्रुवारीपासून विश्‍वचषकाला सुरुवात होत आहे. सर्वंच संघ जिंकण्‍याचा इर्षेने मैदानात उतरणार आहेत. यावर्षी दक्षिण आफ्रिकन संघाचा ‘चोकर्स’ हा शिक्‍का पुसण्‍याचा प्रयत्‍न असेल. त्‍यासाठी त्‍यांनी ऑस्‍ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल हसीला संघाचा सहमार्गदर्शन म्‍हणून घेतले आहे.
विश्‍वचषक ऑस्‍ट्रलियन धरतीवर होत असल्‍याने नक्‍कीच हसीचा दक्षिण आफ्रिकन संघाला फायदा होणार आहे. उल्‍लेखनिय म्‍हणजे मायकल हसी 2007 च्‍या विश्‍व चॅम्पियन ऑस्‍ट्रेलियन संघाचा खेळाडू आहे. पुढील सहा आठवडे हसी दक्षिण आफ्रिकेच्‍या संघासोबत असणार असल्‍याचे संघाचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी सांगितले आहे.
मायकल हसीने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्‍ती स्विकारली आहे. त्‍याचा ऑस्‍ट्रेलियाचा यशस्‍वी फलंदाजामध्‍ये समावेश होतो. हसीने 185 सामन्‍यामध्‍ये 48.15 च्‍या सरासरीने 5442 धावा केल्‍या. त्‍यामध्‍ये तीन शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, धोनीनेही केले हेाते हसीच्‍या मार्गदर्शनाचे सुतोवाच...