आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायकल शूमाकरच्या उपचारात गंभीर चूक; डॉ. गॅरी हार्टस्टीन यांचा आरोप?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर- फॉर्म्युला- वनचा वर्ल्ड चॅम्पियन मायकल शूमाकरची प्रकृती खूपच गंभीर आहे. शूमाकरवर सुरुवातीला करण्यात आलेल्या उपचारात गंभीर चूक झाल्यामुळे त्याच्यावर ही परिस्थिती ओढावल्याचे फॉर्म्युला वनचे माजी डॉ. गॅरी हार्टस्टीन यांनी केला आहे.

'शूमाकरवर सुरुवातीच्या काळात करण्यात आलेल्या उपचारामध्ये झालेल्या गंभीर चुकांमुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे शूमाकरबाबत वाईट बातमी ऐकण्याची आपण सगळ्यांनी तयारी करायला हवी, असे डॉ. हार्टस्टीन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

स्किईंग करतांना झालेल्या अपघातात शूमाकर गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शर्तीचे उपचार सुरु आहेत. परंतु, अद्याप त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नाही.

दरम्यान, फॉर्म्युला वन करिअरमध्ये शूमाकरने रेकॉर्डब्रेक 91 रेसेस जिंकल्या आहेत. 44 वर्षीय शुमाकरने 2006 मध्ये निवृत्ती घेतेल्यानंतर पुन्हा रेस ट्रॅकवर कमबॅक केले होते. परंतु कमबॅक केल्यानंतर त्याला फारसे यश न आल्यामुळे त्याने 2012 मध्ये पुन्हा फॉर्म्युला वनला अलविदा केले होते.