आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायकेल शूमाकरची प्रकृती अधिक चिंताजनक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - गेल्या वर्षी आइस स्केटिंगदरम्यान गंभीररीत्या जखमी झालेला फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकेल शूमाकर अजूनही कोमातून बाहेर आलेला नाही. सध्या त्याची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्याच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. जर्मन मॅगझिनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार ग्रेनोबेल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शूमाकरच्या प्रकृतीबाबत हात वर केले असले, तरीही त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

दुसरीकडे शूमाकरच्या प्रवक्त्याने अशा वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. 45 वर्षीय एफ वन चॅम्पियन शूमाकर 29 डिसेंबर रोजी गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर उपचारदरम्यान, तो अचानक कोमात गेला. तेव्हापासून तो कोमात आहे. मागच्या आठवड्यात मित्र फिलिप मासाने शूमाकरची भेट घेतली होती. शूमाकर सध्या झोपेत असून, पूर्वीपेक्षा त्याच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची प्रतिक्रिया मासाने व्यक्त केली होती.