आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार रेसर मायकल शूमाकरची 45व्या बर्थडेला सुरु आहे मृत्युशी झुंज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेनोबल (फ्रान्स)- 'फॉर्मूला वन'चा माजी विश्वविजेता मायकल शूमाकर याचा आज (शुक्रवारी) 45 वा वाढदिवस आहे. सुसाट वेगाने 'फॉर्मूला वन'च्या शर्यतीत उतरून चाहत्याच्या ह्रदयाचा ठोका चुकवणार शूमाकर आज स्वत:च्या वाढदिवशी अक्षश: मृत्युशी झुंज देतो आहे. फ्रेंच आल्प्सवर स्कीइंग करताना तो पडला होता. शूमाकरच्या डोके दगडावर आपटले गेल्याने त्याच्या गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमातच आहे.
'शूमाकरने रेसिंगमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयुष्याच्या रेसिंगमधून निवृत्ती घेणार नाही.' तो फायटर असून कधीही मागे राहणार नसल्याचे त्याच्या कुटूंबियांनी म्हटले आहे. गेल्या रविवारी आपल्या 14 वर्षीय मुलांसोबत स्कीइंग करताना शूमाकर एका दगडावर आपटला गेला होता. त्याने हेल्मेट घातले होते. तरी देखील शूमाकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मेंदूजवळ रक्त गोठले होते. डॉक्टरांनी शूमाकरच्या तातडीने दोन ब्रेन सर्जरी केल्या आहेत. मात्र, अद्याप तो शुद्धवर आलेला नाही.
सात वेळा फॉर्मूला वन चॅम्पियनशिप पटकावणारा शूमाकर 1999 दरम्यान 2010 अनेकदा दुखापतग्रस्त झाला. मात्र, आता एका साध्या स्कीइंगने त्याला मृत्युच्या दाढेत ढकलले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, चॅम्पियन शूमाकरच्या करियरशी निगडीत फॅक्ट्स आणि स्टंट्‍स...