आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाॅन्सनला गारफील्ड साेबर्स पुरस्कार, सर गारफील्ड सोबर्स पुरस्कारांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटपटू मिशेल जॉन्सन याची २०१४ च्या सर गारफील्ड सोबर्स आयसीसी क्रिकेटर ऑफ दि इयर या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मिशेलची आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ दि इयर म्हणूनदेखील निवड करण्यात आली.

या पुरस्कारासाठी २७ ऑगस्ट २०१३ ते १७ सप्टेंबर २०१४ या कालावधीमध्ये मिशेल जॉन्सनने १५.२३ च्या सरासरीने ५९ कसोटी बळी घेतले होते. इंग्लंडविरुद्धच्या अॅडेलेच्या कसोटी सामन्यात चाळीस धावांच्या मोबदल्यात जॉन्सनने सात बळी नोंदविले होते, तर जॉन्सनने १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २१ बळी घेतले होते.

२००४ मध्ये या पारितोषिकाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या दहा वर्षांत रिकी पाँटिंगच्या नंतर मिशेल जॉन्सन या खेळाडूने दुस-यांदा हा बहुमान मिळविला आहे. जॉन्सनने २००९ मध्ये हा बहुमान पहिल्यांदा मिळविला होता, तर रिकी पाँटिंग यास २००६ आणि २००७ या वर्षी लागोपाठ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतातर्फे हा बहुमान द्रविड व सचिनने मिळविला होता. आफ्रिकेतर्फे जॅक कॅलिस, इंग्लंडचा अँड्रयू फ्लिंटाॅफ, श्रीलंकेच्या कुमार संगकारा यांना सन्मानित करण्यात आले होते, तर मायकेल क्लार्कला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पारितोषिक विजेते
आयसीसी पंच : रिचर्ड केटलबोर
एल जी पीपल्स चॉइस : भुवनेश्वर कुमार
महिला एकदिवसीय खेळाडू : साराह टेलर (इंग्लंड)
एकदिवसीय खेळाडू : ए बी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
उदयोन्मुख खेळाडू : गॅरी बॅलन्स (इंग्लंड)
असोसिएट अँड अॅफिलिएट क्रिकेटर ऑफ द इयर : प्रेस्टॉन मोम्मसेन (स्कॉटलंड)
टी-२० इंटरनॅशनल परफॉर्मन्स ऑफ दि इयर : आरॉन िफन्च (ऑस्ट्रेलिया)
टी-२० आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू : मेग लॅनिन (ऑस्ट्रेलिया)
स्पिरिट ऑफ द क्रिकेट अवॉर्ड : कॅथरिना ब्रंट (इंग्लंड)