मिशेल ओबामा 'तिथे' / मिशेल ओबामा 'तिथे' गेल्या नसत्या तर वाचली असती अमेरिकेची लाज

वृत्तसंस्था

Jul 18,2011 07:14:33 PM IST

फ्रेंकफर्ट - महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जपानने दोन वेळा विश्वविजेत्या असलेल्या अमेरिकेचा ३-१ असा पराभव करीत विश्वकरंडक जिंकला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा या सामना पाहण्यासाठी उपस्थित होत्या.

जपानने अमेरिकेचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-१ असा पराभव केला. मिशेल ओबामा यांची उपस्थिती अमेरिकेसाठी चांगली ठरली नाही. महिला फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेला जपानकडून पराभव स्वीकारावा लागला. बराक ओबामा सुद्धा हा सामना पाहण्यासाठी जपानला जाणार होते. मात्र, ते व्यस्त कार्यक्रमामुळे तेथे जाणे शक्य न झाल्याने त्यांनी मिशेल ओबामाला हा सामना पाहण्यासाठी पाठविले.

X
COMMENT