आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mike Horn And His Contributions To The Success Of Indian Cricket, KKR And German Football

या व्यक्तिने जर्मनीला जगज्‍जेता करण्‍यापूर्वी भारताला बनविले होते वर्ल्‍ड चॅम्पियन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - जर्मनी फुटबॉल संघासमवेत माइक हॉर्न(काळा टी शर्ट))

नवी दिल्‍ली - नुकताच जर्मन फुटबॉल संघ विश्‍वविजेता ठरला आहे. या विजयामागे महत्‍वाची भूमिका निभावली आहे ती म्‍हणजे एक्‍सप्‍लोरर आणि मोटिव्‍हेशनल स्‍पीकर माइक हॉर्न यांनी. माइक हॉर्न यांनी यापूर्वी भारताला चॅम्पियन आणि कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएलमध्‍ये चॅम्पियन बनवले होते. संघाला सकारात्‍मक विचार, ऊर्जा आणि प्रेरणा देण्‍याचे काम माइक हॉर्न करतात.

सचिन तेंडुलकरने मानले होते आभार
2011 मध्‍ये भारतीय संघाने क्रिकेटचा विश्‍व चषकावर आपले नाव कोरले होते. त्‍यामध्‍ये महत्‍वाची भूमिका हॉर्न यांची राहिली आहे. तत्‍कालीन प्रशिक्षक गॅरी कस्‍टर्न यांनी खेळाडू मानसिकदृष्‍टया मजबूत राहण्‍यासाठी दक्षिण आफ्रिकेहून माइक हॉर्न यांना आमंत्रित केले होते. जेव्‍हा भारत चॅम्पियन ठरला होता त्‍यावेळी सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग यांनी माइकचे जाहीर आभार मानले होते.

केकेआर च्‍या विजयाचा 'जादुगार'
भारतीय संघानंतर माइक हॉर्न यांनी आपली जादू आयपीएलमध्‍ये दाखवली. 2013 मध्‍ये कोलकाता 16 पैकी 10 सामनेच जिंकू शकला होता. कोलकात्‍याची अत्‍यंत दयनिय परिस्थिती झाली होती. त्‍यातून कोलकात्‍याला तारणारा खरा जादुगार हॉर्न ठरला. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला आयपीएल चॅम्पियन बनविण्‍यात त्‍यांनी महत्‍वाची भूमिका निभावली. विजयानंतर केकेआरने केलेले ट्वीट

@KKRiders
Your magic wand has worked again. Congratulations @ExploreMikeHorn. You're the true champion.
3:31 AM - 14 Jul 2014

क्रिकेटनंतर आता फुटबॉल
हॉर्नने स्‍व:ताला सिध्‍द करुन दाखवले की, तो फक्‍त क्रिकेटपुरताचा मर्यादीत नाही. त्‍यांनी जर्मनी संघाला मार्गदर्शन केले. पारंपरिक भाषणबाजी व्‍यतिरिक्‍त ते फुटबॉल संघाला नौकाविहारासाठी घेऊन गेले. आज जर्मनी विश्‍वविजेता ठरली आहे. जर्मनी संघाचा कर्णधार फिलीप लॅमने विजयाचे श्रेय हॉर्नला दिले आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, माइक हॉर्नची विविध दिग्‍गज खेळाडूसमवेत छायाचित्रे..