आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्‍सच्‍या आहारी होता टायसन, महिलांसोबत मजा मारण्‍यातच झाला उद्ध्‍वस्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- बॉक्सिंगच्‍या विश्‍वात एकेकाळी अधिराज्‍य गाजवणारा आणि प्रतिस्‍पर्ध्‍याच्‍या मनात धडकी भरविणारा वादग्रस्‍त माईक टायसन पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. त्‍याने आत्‍मचरित्र लिहीले असून त्‍यात अतिशय वादग्रसत खुलासे केल्‍यामुळे खळबळ उडाली आहे. 'द अनडिस्‍प्‍युटेड ट्रूथ' या नावाने त्‍याने आत्‍मकथा लिहीली आहे. त्‍यात त्‍याने आयुष्‍यातील अनेक तथ्‍य प्रथमच जगासमोर मांडले आहेत.

माईक टायसनची कारकिर्द अतिशय वादग्रस्‍त ठरली आहे. हॉलिफिल्‍डचा चावा घेण्‍यापासून डोपिंग चाचणीत दोषी आढळेपर्यंत त्‍याचे प्रत्‍येक पाऊल वादात अडकले होते. असे अनेक खळबळजनक वाद त्‍याने उकरुन काढतानाच काही नव्‍या गोष्‍टीही उघड केल्‍या आहेत. त्‍याने लिहीले आहे, की तो ड्रग्‍सच्‍या आहारी गेला होता. वयाच्‍या 11 व्‍या वर्षापासूनच कोकेनचे सेवन करु लागला होता. कोकेन आणि मारिजुआनाचे त्‍याने कायम सेवन केले आहे. डोपिंग चाचणीमध्‍ये अनेक वर्षे तो सापडला नव्‍हता. याचे कारण म्‍हणजे, तो कृत्रिम गुप्‍तांग वापरुन चाचणी घेणा-यांना चकवत होता. यासंदर्भात त्‍याने सांगतले, की जून 2000 मध्‍ये लू सावारीसविरुद्धच्‍या लढतीपूर्वी डोप चाचणी घेण्‍यात आली होती. यापासून वाचण्‍यासाठी त्‍याने जबरदस्‍त शक्‍कल लढविली. तोच काय, इतर अनेक जण ही युक्ती वापरत होते. टायसनने बनावट गुप्‍तांग सोबत ठेवले होते. त्‍याला 'व्हिजर' असे नाव होते. प्रत्‍येक मुष्‍टीयोद्धा व्हिजर घेऊन येत होता. त्‍यात दुस-याच व्‍यक्तीचे मुत्र भरुन आणत. त्‍यामुळे ते डोप चाचणीत कधीही अडकले नाही.

टायसन ही युक्ती वापरुन अनेकदा वाचला. परंतु, अखेर जाळ्यात अडकला. त्‍याच वर्षी तो डोप चाचणी पॉझिटीव्‍ह आढळला. त्‍याला 2 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्‍यात आला. आपला सहकारी वेळत व्हिजर आणू शकला नाही. त्‍यामुळे तो डोप चाचणीत अडकला.

टायसनने असे अनेक खुलासे केले आहेत. पुस्‍तक लिहीताना असे वाटले, की माझे आयुष्‍यक एक जोक बनले आहे, असेही तो म्‍हणतो.

टायसनने केलेले खुलासे वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्वर...