आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी अब्‍जावधींचा मालक होता हा चॅम्‍प...चित्रविचित्र छंदामुळे निघाले दिवाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्‍हीवर तुम्‍ही 'शौक बडी चीज है' ही जाहिरात पाहिली असेलच. कधी-कधी या छंदावरूनच त्‍या व्‍यक्‍तीची वेगळी ओळख निर्माण होत असते. परंतु, कधी हे छंदच त्‍यांचे शत्रू बनतात.

महेंद्रसिंह धोनीला कुत्रे पाळण्‍याची आवड आहे, तर सचिन तेंडुलकरला गाणे ऐकण्‍याचा छंद आहे. जर एखाद्याला वाघ पाळण्‍याची आवड असेल तर ? बॉक्सिंग जगतात बेताज बादशाह राहिलेल्‍या माईक टायसनला अशाचप्रकारच्‍या कीड्याने चावले होते.

आपल्‍या दमदार ठोश्‍यांनी त्‍याने अब्‍जावधींची कमाई केली होती. न्‍यूयॉर्क टाईम्‍सच्‍या मते टायसनने आपल्‍या बॉक्सिंग करिअरमध्‍ये 400 मिलियन डॉलर म्‍हणजे सुमारे 2444.6 कोटींची कमाई केली होती. 'आर्यन माईक' टायसनने जर आरामात आयुष्‍य जगायचे ठरवले असते तर तो तसे करू शकला असता. परंतु, त्‍याच्‍या चित्रविचित्र छंदाने त्‍याचे दिवाळे निघाले.

बलात्‍काराचा आरोप झाल्‍यानंतर त्‍याची नाचक्‍की झाली होती. त्‍यानंतर घटस्‍फोटामुळे नऊ मिलियन डॉलरने त्‍याचा खिसा रिकामा केला. जेव्‍हा 2003 साली त्‍याने स्‍वत:ला दिवाळखोर घोषित केले. तेव्‍हा त्‍याच्‍यावर 27 मिलियन डॉलरचे कर्ज झाले होते.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, टायसनचे चित्रविचित्र छंद ज्‍याने तो आला रस्‍त्‍यावर...