Home »Sports »Other Sports» Milan Defeat Bursilona In Football League

मिलानने चॅम्यिपन्स लीग फुटबॉलमध्ये बार्सिलोनाला दिला दणका

वृत्तसंस्था | Feb 22, 2013, 01:25 AM IST

  • मिलानने चॅम्यिपन्स लीग फुटबॉलमध्ये बार्सिलोनाला दिला दणका

मिलान - एसी मिलानने चॅम्यिपन्स लीग फुटबॉलमध्ये लियोनेल मेसीच्या बार्सिलोनाला पराभवाचा दणका दिला. घरच्या मैदानावर केविन प्रिन्स बोअटेंग (57 मि.) व सुली मुंटारी (81मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर यजमान मिलानने 2-0 ने विजय मिळवला. पिछाडीवर पडलेल्या बार्सिलोनाला शेवटपर्यंत लढतीत एकही गोल करता आला नाही.

दोन्ही तुल्यबळ संघांमधील हा सामना अधिकच रोमांचक झाला. 56 व्या मिनिटापर्यंत ही रंगतदार लढत 0-0 ने बरोबरीत खेळवली गेली. अखेर, 57 व्या मिनिटाला घानाच्या केविन बोअटेंगने यजमानांकडून गोलचे खाते उघडले. त्याने सुरेख गोल करून एसी मिलानला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. बार्सिलोनाला लढतीत बरोबरी मिळवून देण्यासाठी लियोनेल मेसी सपशेल अपयशी ठरला. पाहुण्या टीमच्या सुमार कामगिरीचा फायदा घेत मुंटारीने 81 व्या मिनिटाला वैयक्तिक पहिला व मिलानकडून दुसरा गोल केला. या गोलच्या बळावर मिलनला 2-0 ने आघाडीला मजबूत करता आले. या आघाडीला राखून ठेवत यजमानांनी लढतीत शानदार विजय मिळवला.

लीड्स युनायटेड विजयी
दुसरीकडे लंडन येथे इंग्लिश फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये लीड्स युनायटेडने ब्लॅकपूलचा 2-0 ने पराभव केला. नुरीस (57) व मोरीसन (63) यांनी गोल करून लीड्सला एकतर्फी विजय मिळवून दिला. ही रंगतदार लढत मध्यंतरापर्यंत 0-0 ने बरोबरीत होती. दुसºया हाफमध्ये नुरीसने 57 व्या मिनिटाला ब्लॅकपूलविरुद्ध पहिला गोल केला.

Next Article

Recommended