आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजांच्‍या घरात घुसून फडकवला होता तिरंगा, खासगी आयुष्‍यात असे होते मिल्‍खा सिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्‍याला कितीही यश, प्रसिद्धी मिळाली तरी त्‍याला जी गोष्‍ट सर्वात जास्‍त प्रेरित करते त्‍यामागे ग्‍लॅमरस चेहरा नाही तर असतो त्‍याचा छुपा संघर्ष.

इंग्रजांना त्‍यांच्‍या मायदेशात जाऊन धूळ चारणा-या मिल्‍खा सिंग यांना देश विसरल्‍यातच जमा होता. स्‍थानिक कार्यक्रमांपर्यंतच मर्यादित राहिलेल्‍या या हस्‍तीची नव्‍या पिढीला ओळख करून दिली ती बॉलिवूडचे दिग्‍दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी. 'भाग मिल्‍खा भाग'ला मिळालेल्‍या यशावर सध्‍या बॉलिवूड आनंदात आहे. कोणतेही ग्‍लॅमर नसताना कोट्यवधी रूपयांची कमाई करणा-या या चित्रपटात एका अ‍ॅथलीटच्‍या जीवनाचा संघर्ष दाखवण्‍यात आला आहे.

पाकिस्‍तानातून आपला जीवन वाचण्‍यासाठी 10 दिवस आपल्‍या कुटुंबियांच्‍या रक्‍ताने माखलेल्‍या कपड्यानिशी पळणारा हा मुलगा भविष्‍यात देशातील महान अ‍ॅथलीट बनेल असे कोणाला वाटलेही नसेल. मिल्‍खा सिंग यांनी आपली मेहनत आणि जिद्दीच्‍या जोरावर अशक्‍यप्राय अशी गोष्‍ट करून दाखवली. आज त्‍यांचे नाव देशातील श्रीमंत अ‍ॅथलीट्समध्‍ये घेतले जाते.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा संपूर्ण जगाला आपल्‍या मेहनत आणि जिद्दीच्‍या जोरावर प्रेरणा देणा-या मिल्‍खा सिंग यांच्‍या खासगी आयुष्‍यातील काही माहित नसलेले क्षण...