आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिल्खा यांच्या गुरुमंत्राने मिळाले सोनेरी यश : देवेंद्र झाजरिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मिल्खा सिंग यांनी दिलेल्या गुरुमंत्रामुळे मला आयपीएल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सोनेरी यश मिळाले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र झाजरियाने दिली. सोमवारी फ्रान्सच्या लियोन येथील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देवेंद्रने सुवर्णपदक पटकावले. त्याने 54.07 मीटर भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले. यापूर्वी, त्याने 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये विश्वविक्रम केला होता.

‘मिल्खा सिंग हे माझे आदर्श आहेत. त्यांनी अर्जुन पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान, मला अनमोल मार्गदर्शन केले होते. त्यांनी मला मन लावून खेळण्याचे सांगितले. त्यामुळे मला सुवर्ण कामगिरी करता आली. मैदानावर उतरल्यावर माझ्या डोक्यात केवळ चॅम्पियनशिपचा 55.50 मीटरचा विक्रम ब्रेक करण्याचा विचार सुरू होता. शेवटच्या संधीमध्ये मी यश मिळवले,’ असेही तो म्हणाला.


आठव्या वर्षी हात गमावला
अथेन्स आॅलिम्पिकपाठोपाठ फ्रान्समधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या देवेंद्रला वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या आघाताला सामोरे जावे लागले. यामध्ये त्याचा डावा हात गेला. मात्र, त्याने कोणत्याही प्रकारचे दु:ख न करता आलेल्या परिस्थितीचा धाडसाने सामना केला. तो उजव्या हाताने सर्व काही कामे करतो.