आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीलुटाइटचा जागतिक जलतरण स्पर्धेत नवा विश्वविक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सलोना - लिथुआनियाची युवा खेळाडू रुटा मीलुटाइटने जागतिक जलतरण स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी महिलांच्या 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये नवा विश्वविक्रम केला. यासह तिने किताबही आपल्या नावे केला. अमेरिकेच्या युजीन गाडसूने रौप्य आणि फ्रान्सच्या फ्रेड बास्केने कांस्यपदक जिकंले.

16 वर्षीय मीलुटाइटने इतिहास नोंदवताना उपांत्य फेरीत एक मिनिट 4.35 सेकंदांची वेळ काढून अमेरिकेच्या जेसिका हार्डीच्या 2009 मधील विक्रमाला सेकंदाच्या दहाव्या भागाने मागे टाकले. लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन मीलुटाइट दोन दशकांपूर्वी, लिथुआनियाच्या सोव्हिएत संघातून वेगळे झाल्यानंतर विश्वविक्रम करणारी देशातील पहिली खेळाडू आहे. तिने सोमवारी सकाळी हिटमध्ये एक मिनिट 4.52 सेकंदांची वेळ काढून विश्वविक्रमाकडे आगेकूच केली होती. स्पर्धेत ब्राझील, हंगेरी, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडनदेखील सुवर्णपदक जिंकले. ब्राझीलच्या सीजरने सलग दुसर्‍यांदा सुवर्ण पटकावले.