आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Misbah Should Be More Stern With Players, Says Shoaib Akhtar

अंपायरिंगमुळे गमावला सामना; पाकचा कांगावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची-' विश्वचषकातील पहिल्या सामन्यात खराब पंचगिरीमुळेच आम्ही भारताविरुद्ध हरल्याचा दावा पाकने केला अाहे. ऑफस्पिनर सईद अजमलने म्हटले अाहे की स्टीव्ह डेव्हिस यांनी रेफरल निर्णयात उमर अकमलला बाद दिल्याचा फटका पाकला बसल्याचा दावा एका वाहिनीशी बाेलताना केला अाहे. जेव्हा मी गाेलंदाजी करायचो, त्या वेळी स्टीव्ह डेव्हिस यांनी कधीही अपील एेकले नाही. मला बळी मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी रेफरलचा अाधार घ्यावा लागत हाेता. स्टीव्हसमवेत पाक संघाचा नेहमीच वाद व्हायचा. पाकला हा अंपायर कधीच नकाे हाेता, मात्र अामचे एेकले गेले नाही. त्याच्या विधानाशी सरफराज नवाझ अाणि इम्रान नजीर यांनीदेखील सहमती दर्शवली. स्किनोमीटरवर काेणताही आवाज अाला नाही तर अकमलला बाद कसे दिले गेले ? असेही त्याने नमूद केले.

पाकच्या माजी खेळाडूंनी केली टीका
विश्वचषकातील पराभवानंतर पाकच्या माध्यमांनी संघावर टीकेची ताेफ डागली अाहे. पाक सलग सहाव्यांदा विश्वचषकात पराभूत झाला अाहे. डेली टाइम्सने पाकला भारताची परंपरा राेखू शकला नसल्याचे सांगितले. मिसबाहच्या संघाकडून चमत्काराची अपेक्षा हाेती, मात्र तसे घडले नाही. डाॅनने म्हटले अाहे की भारताने अापल्या चांगल्या खेळामुळे विजयाचा विक्रम कायम ठेवला. तसेच अकमलच्या खराब कीपिंगवरही कडक ताशेरे अाेढले. या सामन्यात पाकने प्रयाेग करायला नकाे हाेते, असे मत पाकचा माजी कर्णधार जावेद मियांदादने व्यक्त केलेे. युनूसला सलामीला पाठवणे व यष्टिरक्षक सरफराजला न खेळवणे ही चूक हाेती, असेही म्हटले अाहे. पराभव हे संघाच्या मानसिक कमजाेरीचे लक्षण असल्याचे रमीझ राजाने सांगितले. शाेएब अख्तरने मिसबाहला कठाेर बनण्याचा सल्ला दिला.