आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Misbah Should Be More Stern With Players, Says Shoaib Akhtar

शोएब अख्तरलाही पराभव बोचला, म्‍हणाला- \'खेळाडूंची हकालपट्टी करा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पाकिस्‍तानी फलंदाजांनी चूकीचे फटके मारुन हाताने पराभव ओढून घेतला. अशा खेळाडूंशी मिस्‍बाहने कठोरतेन वागले पाहिजे. ज्‍यांनी चांगले प्रदर्शन केले नाही अशांची हकालपट्टी करायला हवी. या पराभवामुळे आपण निराश झाल्‍याचेही पाकिस्‍तानची रावळपिंडी एक्‍सप्रेस शोएब अख्‍तरने म्‍हटले आहे.
(फोटो - सामन्‍यानंतर एकमेकांना भेटताना भारत-पाक खेळाडू)
अत्‍यंत चुरसीच्‍या आणि अ‍टीतटीच्‍या मानल्‍या जाणा-या हा सामना भारताने 76 धावांनी जिंकला. हा पराभव सर्व पाकिस्‍तानी माजी खेळाडू तसेच चाहत्‍यांना बोचला आहे. शोएब अख्तर, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि जावेद मियांदाद यांनी पाकिस्‍तान संघाची चांगलीच खरडपट्टी केली आहे. कारण पाकिस्‍तान विश्‍वचषकामध्‍ये भारताला एकदाही पराभूत करु शकला नाही.
काहींची संघातून हकालपटृी करा
मिस्‍बाहने कठोर भूमिका घ्‍यायला हवी. जो चांगले प्रदर्शन करणार नाही त्‍या खेळाडूला बाहेरची वाट दाखवावी. अहमद शहजाद काय खेळत आहे? त्‍याच्‍या खेळीत जिंकण्‍याची उमेदच दिसली नाही. इम्रान खानच्‍या नेतृत्‍तात हा संघ असता तर त्‍याने अर्धा खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्‍ता दाखविला असता. असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्‍तर व्‍यक्‍त केले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, काय म्‍हणाले वरीष्‍ठ खेळाडू..