आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Misbah Ul Haq Angry On Icc For Not Giving Chance To Organize International Competition

आयसीसी टुर्नामेंट आयोजनाची संधी न मिळाल्याने मिसबाह नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला पुन्हा एकदा आयसीसीने जबर धक्का दिला आहे. आगामी 2023 पर्यंत होणार्‍या कोणत्याही स्पर्धेचे यजमानपद पाकला देण्यात आले नाही. यावर पाक संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हकने प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्याने संघाच्या सुमार कामगिरीचे खापर दहशतवादी कारवायांवर फोडले.

‘पाकमध्ये कोणतीही मोठी स्पर्धा होणार नाही. यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनांचीही पीसीबीला संधी देण्यात आली नाही. माझ्यासाठी हे फार दु:खदायक वृत्त आहे,’ असेही तो म्हणाला. 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकमध्ये अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले नाही.