फोटो: शतकीय पारीदरम्यान शॉट लगावताना मिस्बाह उल हक
अबु धाबी - कित्येक दिवसांपासून फॉर्मशी झगडणारा आणि त्यामुळे टीकाकारांचे लक्ष बनलेला पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मिस्बाह उल हक चांगलाच लयीत आला आहे. त्याने केवळ 56 चेंडूंत (11 चौकर आणि 5 षटकार) लगावत शानदार शतक ठोकले आहे. या शतकासह त्याने 28 वर्ष पूर्वीचे 'सर' व्हिव्हियन रिचर्ड्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द दुस-या कसोटीमध्ये त्याने हा विक्रम केला.
21 चेंडूत अर्धशतक
मिस्बाहने शेख जाएद स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्द दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी सर्वांत वेगवान अर्धशतक लगावले. केवळ 21 चेंडूत त्याने चार चौकार आणि चार षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले.
तुटला कॅलिसचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने 2004-05 मध्ये झिम्बॉंब्वे विरुध्द 24 चेंडूत अर्धशतक करुन इतिहास प्रस्तापीत केला होता. परंतु मिस्बाहने 21 चेंडूत अर्धशत पूर्ण करुन प्रथम स्थानी झेप घेतली आहे. सर्वांत जलद अर्धशतक करणा-यांच्या यादीमध्ये पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा चौथा क्रमांक लागतो. आफ्रिदीने वेस्ट इंडिज विरुध्द 26 चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. तीस-या स्थानी वेस्टइंडीजच्या शेन शिलिंगफोर्डचा नंबर लागतो. त्याने 25 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले होते.
पुढील स्लाइडवर वाचा, कोणत्या खेळाडूंनी किती चेंडूत ठोकले शतक