आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मि. वर्ल्ड सुहासचा उपोषणाचा इशारा; फाइल मंत्रालयात धूळ खात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्य शासनाने मला प्रथम र्शेणी अधिकारी करण्याचे आश्वासन दिले होते. मि. एशिया किताब पटकावला. मात्र, त्यानंतर मागील एक वर्षापासून माझी फाइल शासनाच्या दरबारात धूळ खात पडून आहे. शासनाने दिलेला शब्द पाळला नाही. मी लवकरच उपोषण करणार आहे. राज्यातील सर्व युवकांना एकत्र बोलावून शक्ती प्रदर्शन करणार असल्याची प्रतिक्रिया मि. वर्ल्ड सुहास खामकरने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

राज्यातील युवा शरीरसौष्ठवपटू माझ्याकडे आयडॉल म्हणून पाहतात. मात्र, आजघडीला माझी शासन दरबारी होणारी उपेक्षा पाहता ते या खेळाकडे किती आकर्षित होतील हे सांगणे कठीण आहे. भविष्य सुरक्षित नसल्याचा विचार करून खेळाडू दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने नियमात राहून योग्य वेळी निर्णय घेतल्यास सर्व खेळातील खेळाडूंमध्ये उत्साह आणि खेळाचे आकर्षण ठिकून राहिल.

नियमात अनेक त्रुटी : शासनाच्या जीआरमधील त्रुटी दुरुस्त होणे गरजेचे आहे. माझी फाइल ‘एकदा थेट नियुक्त दिल्यानंतर दुसरी थेट नियुक्ती देता येणार नाही’ या वाक्यामुळे वर्षभरापासून मंत्रालयात पडून आहे. कुवत असताना मला संधी दिली जात नाही. दुसर्‍या राज्यात मला आजही क्लास वनचे पद मिळेल. परंतु मी दुसर्‍या राज्यात निघून गेलो तर येथील कारभार असाच सुरू राहील. दुसर्‍या खेळाडूंच्या प्रश्नासाठी मला येथे राहणे गरजेचे असल्याचे खामकर म्हणाला.

मेहनतीशिवाय पर्याय नाही
शरीरसौष्ठवमध्ये संयम, मेहनत, जिद्द आणि एकाग्रतेची गरज असते. या गोष्टी आत्मसात करणाराच उत्कृष्ट शरीरसौष्ठवपटू बनू शकतो. या खेळात शॉर्टकट नसल्याने मेहनतीशिवाय पर्याय नाही. युवकांनी केवळ शरीरसौष्ठव बनण्यासाठी नव्हे, तर स्वत:च्या फिटनेससाठी तरी व्यायाम करायला हवा. त्यामुळे आपला देश सशक्त बनेल. महिला-मुलींनी या खेळाकडे वळायला हवे, त्यांना येथे भरपूर संधी आहे. मुलींच्या बाबतीत भारतीयांची मानसिकता लवकरच बदलेले.