आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायबंदी झाल्‍याने मिशेल स्‍टार्क मायदेशी रवाना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली- ऑस्‍ट्रेलिया संघासमोरील शुक्‍लकाष्‍ट संपण्‍याची चिन्‍हे दिसत नाही. एकीकडे कर्णधार मायकल क्‍लार्क आपल्‍या पाठीच्‍या दुखण्‍यामुळे दिल्‍ली कसोटीत खेळण्‍याची शक्‍यता कमी आहे. तर दुसरीकडे संघाचा मुख्‍य वेगवान गोलंदाज मिशेल स्‍टार्क टाचेच्‍या दुखण्‍यामुळे दिल्‍ली कसोटीतून बाहेर पडला आहे.

स्‍टार्क आपल्‍या टाचेच्‍या दुखापतीवर शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी मायदेशी परतला आहे. मोहाली येथे झालेल्‍या तिस-या कसोटीत आपल्‍या गोलंदाजी आणि फलंदाजीने प्रभावित केले होते. त्‍याने पहिल्‍या डावात 99 आणि दुस-या डावात 35 धावांची खेळी केली होती. त्‍याचबरोबर गोलंदाजीत त्‍याने दोन विकेटही घेतल्‍या होत्‍या.

संपूर्ण मालिकेत स्‍टार्कला टाचेचा त्रास होत होता. आता त्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍याची गरज आहे. अ‍ॅशेज मालिकेपूर्वी तो फिट होणे गरजेचे आहे. पुढच्‍या आठवडयात त्‍याच्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे, अशी माहिती एका क्रिकेट वेबसाईटने ऑस्‍ट्रेलिया टीमचे फिजिओ पीटर बुकनर यांच्‍या हवाल्‍याने दिली आहे.