आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mitchell Johnson Doubtful For Sydney Test Vs India

चौथ्या कसोटीला जॉन्सन मुकणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - सलगच्या विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या यजमान ऑस्ट्रेलिया संघाला आता चौथ्या कसोटीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मिशेल जौन्सन या सिडनी कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. त्याने शनिवारी संघाच्या सरावालाही दांडी मारली. त्यामुळे त्याचा चौथ्या कसोटीतील सहभाग संदिग्ध मानला जात आहे. मांसपेशीतील दुखापतीमुळे तो या कसोटीला मुकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

त्यामुळे त्याच्या जागी संघात मिशेल स्टार्क वा पीटर सिडल यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. जॉन्सन अनफिट असल्याचे स्पष्ट झाल्यावर या दोन्हींपैकी एकाची निवड चौथ्या कसोटीसाठी केली जाईल. भारताविरुद्ध कसोटी मालिकेत जॉन्सनने समाधानकारक कामगिरी केली आहे.