आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mitchell Johnson Lauds 'spoilt Brat' Virat Kohli Ahead Of 4th Test

मंगळवारपासून चौथ्या कसोटीला प्रारंभ; विराट अधिक आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - टीम इंडियाचा नवीन कर्णधार विराट कोहली हा धोनीपेक्षा वेगळा आणि अधिक आक्रमक आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत भारतीय संघ अधिक आक्रमकपणा दाखवू शकतो, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने दिला. त्यामुळे आता यजमान ऑस्ट्रेलिया संघाला चौथ्या कसोटीत विजयासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल, असेही तो म्हणाला. येत्या ६ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. सलगच्या दोन कसोटींतील शानदार विजयाने ऑस्ट्रेलियाने मालिकेत दबदबा निर्माण केला. दरम्यान, तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली. यासह यजमान ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

याशिवाय अधिक वेगाने गोंलंदाजी करून मी टीम इंडियाच्या आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देईन, असा इशारेवजा विश्वासही जॉन्सनने व्यक्त केला.

कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहली आणि जॉन्सन यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे आता हे
दोन्ही खेळाडू सिडनी कसोटीत अधिक आक्रमकपणे खेळण्याची शक्यता आहे.

‘विराट कोहलीकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवले जाणे हे अधिकच रोचक आहे. कारण टीम इंडियाला आक्रमक खेळण्यासाठी ओळखले जात नाही. मात्र, यात विराट कोहली हाच एकटा आक्रमक आहे. त्याला पाहिल्यावर हे माझ्या लक्षात आले. धोनीच्या तुलनेत कोहलीच्या गुणकौशल्यात अनेक प्रकारचा फरक जाणवतो. तो एक वेगळाच लढवय्या आहे,’ असेही गोलंदाज जॉन्सन या वेळी म्हणाला. विराट कोहलीने या मालिकेत शानदार कामगिरी करून आपला वेगळा ठसा उमटवला. याशिवाय मालिकेत विराट कोहलीची आक्रमकताही वेळाेवेळी केलेल्या झंझावाती फलंदाजीतून दिसून आली.