आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मितालीच्या 6000 धावा, पाहा जगातील टॉप-10 धावा करणा-या महिला क्रिकेटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स- भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला. मितालीने बुधवारी महिला वर्ल्डकपमध्ये आपल्या 164 डावांत 6,028 धावांचा टप्पा गाठला. तसेच महिला क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पा ओलंडणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 69 धावांची खेळी करताना तिने या विक्रमाला गवसणी घातली. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या शॉर्लेट एडवर्ड्सच्या नावावर होता. एडवर्सने 5992 धावांचा विक्रम मितालीने कालच्या डावात 34 धावा करताच मोडला गेला. या विक्रम करताना मितालीने महेंद्रसिंग धोनी, रिकी पाँटिंग व सचिनचाही विक्रम मोडला आहे. वनडेत 6 हजार धावांचा टप्पा सचिनने 170 डावात तर, पाँटिंग व धोनीने प्रत्येकी 166 डावांत गाठला होता. मितालीने ही कामगिरी केवळ 164 डावांत करून दाखवली.
 
क्लासिकल डान्सर होते बनायचे- 
 
- मितालीचा जन्म जोधपूर येथे 3 डिसेंबर 1982 रोजी झाला. तिचे पिता दुराई राज एयरफोर्समध्ये ऑफिसर होते. तर आई लीला राज क्रिकेट खेळायच्या.
- मिताली तमिळी असल्याने तिने लहानपणापासून क्लासिकल डान्स शिकायला सुरुवात केली होती.
- वयाच्या 10 व्या वर्षी मिताली भरतनाट्यममध्ये पारंगत झाली होती. ती डान्समध्येच करिअर करू इच्छित होती.
- मात्र, मिताली लहानपणी आळशी असल्याने तिच्या वडिलांनी तिला अॅक्टिव्ह करण्यासाठी क्रिकेट खेळायला सांगितले.
- यानंतर तिचे स्कूलिंग हैदराबादमध्ये झाले. यावेळी ती मुलांसमवेत क्रिकेटचा सराव करायची. वयाच्या 17 व्या वर्षी तिची भारतीय संघात निवड झाली.
 
बॅटिंगच्या आधी पुस्तके वाचते- 
 
- मितालीने सांगितले की, सुरुवातीला मी आई-वडिलांच्या आनंदासाठी क्रिकेट खेळायचे. पण खरं तर माझे पहिले प्रेम भरतनाट्यमच होते. नंतर मला सिविल सर्विसमध्ये जावे असे वाटायचे.
- मितालीला पुस्तके वाचायला आवडतात. ती मॅचदरम्यान बॅटिंगआधी पुस्तके वाचत बसलेली असते.
- मितालीने 26 जून 1999 रोजी वयाच्या 17 व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आर्यलंडविरूद्ध डेब्यू केला होता.
- डेब्यू सामन्यातच तिने शतक ठोकले होते.
- वयाच्या 21 व्या वर्षी ती भारतीय संघाची कर्णधार झाली होती.
- 2013 मध्ये ती वन डेमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये नंबर वन खेळाडू ठरली होती.
- 2015 मध्ये तिला पद्म अॅवॉर्ड दिला गेला आहे. 

पुढे स्लाईडद्वारे पाहूया, महिला क्रिकेटमध्ये वन डे मध्ये टॉप-10 धावा करणा-या महिला क्रिकेटर..
बातम्या आणखी आहेत...