आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मियामी - तिसरा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेररने रोमांचक सामन्यात जर्मनीच्या टॉमी हॅसला 4-6, 6-2, 6-3 ने पराभूत करीत मियामी मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये त्याचा सामना अँडी मुरेशी होईल. मुरेने सेमीफायनलमध्ये गास्केटला 6-7, 6-1, 6-2 ने हरवले
जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू फेररने सेमीफायनलमध्ये सुरुवातीपासूनच चांगला खेळत होता. मात्र, तरीही त्याने पहिला सेट गमावला. यानंतर दुस-या आणि तिस-या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करताना त्याने बाजी मारली. तिस-या सेटमध्ये टॉमी हॅसने पुन्हा एकदा 3-1 ने आघाडी घेतली होती. यामुळे 11 वर्षांत प्रथमच तो फायनलमध्ये खेळेल, असे वाटत होते. मात्र, फेररने पुनरागमन करण्यात वेळ लावला नाही. हॅसच्या चुकांचा फायदा त्याने उचलला आणि तिस-या सेटसह सामना जिंकला.
अँडी मुरे-गास्केटची लढत
गतविजेता आणि मागच्या वर्षीचा उपविजेता मुरेला गास्केटकडून कठोर आव्हान मिळाले. टायब्रेकरपर्यंत खेचल्या गेलेल्या पहिल्या सेटमध्ये गास्केटने बाजी मारली. मुरेने सामन्यत पुनरागमन करताना पुढचे दोन्ही सेट जिंकले. मुरेने कारकीर्दीत तिस-यांदा फायनलमध्ये प्रवेश केला.
26 वर्षीय मुरेने 6 ऐस मारले आणि पहिल्या सर्वच्या 75 टक्के गुण मिळवले. दोन तास चाललेल्या लढतीत मुरेला बराच संघर्ष करावा लागला. मुरे व गास्केट यांचा करिअरमध्ये आठ वेळा सामना झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.