आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Miyami Masters Tenis : Serena Sharapova In Final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मियामी मास्टर्स टेनिस : सेरेना- शारापोवा यांच्यात फायनल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - जगातील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्स आणि जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेली मारिया शारापोवा यांच्यात मियामी मास्टर्स किताबासाठी फायनल मुकाबला होईल. पुरुष गटात इंग्लंडच्या अ‍ॅँडी मुरेने उपांत्य फेरी गाठली.

पाच वेळची चॅम्पियन सेरेनाने उपांत्य लढतीत चौथ्या मानांकित अग्निस्का रांदावस्काला 6-0, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. सेरेनाने सुरेख कामगिरी करताना स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा माजी खेळाडू स्टेफी ग्राफचा 596 चा विक्रम मोडीत काढला.

अमेरिकेच्या खेळाडूने अवघ्या 65 मिनिटांमध्ये पोलंडच्या रांदावस्काचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. गत वर्षी विम्बल्डन स्पर्धेत पोलंडच्या खेळाडूला सेरेनाविरुद्ध लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
दुसरीकडे रशियाच्या शारापोवाने सर्बियाच्या येलेना यांकोविचला सलग दोन सेटमध्ये 6-2, 6-1 अशा फरकाने पराभूत केले. या उपांत्य लढतीच्या सुरुवातीला सर्बियाच्या खेळाडूने शारापोवावर दबाव निर्माण केला आणि सुरुवातीचे 10 गुण मिळवले. तिस-या मानांकित शारापोवाने यांकोविचची सहा वेळ सर्व्हिस ब्रेक केली आणि एकतर्फी लढतीत विजय मिळवून फायनलमधील प्रवेश निश्चित केला.


मुरे सेमीफायनलमध्ये
लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अ‍ॅँडी मुरेने नवव्या मानांकित मारिन सिलीकचा 6-4, 6-3 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह त्याने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.