आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Miyami Open Tenis Competation : Somdev Defeated By Yockovich

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मियामी ओपन टेनिस स्पर्धा : सोमदेवला पराभूत करून योकोविक चौथ्या फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या सर्बियाच्या नोवाक योकोविकने मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील तिस-या फेरीत भारताच्या सोमदेव देववर्मनला सहजपणे नमवले. योकोविकने ही लढत 6-2, 6-4 ने आपल्या नावे करीत चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.

तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणा-या योकोविकला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी पुढच्या फेरीत जर्मनीच्या टॉमी हॅसला नमवावे लागेल. 25 वर्षीय योकोविकने येथे 2007, 2011 आणि 2012 मध्ये मियामी मास्टर्सचा किताब पटकावला होता. योकोविकला क्रमवारीत 254 व्या स्थानी असलेल्या सोमदेवविरुद्ध विजय मिळवण्यात कसलीच अडचण आली नाही.


पेस, भूपतीचा पराभव
लिएंडर पेस आणि महेश भूपतीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बल्गेरियाच्या ग्रनीर दिमित्रोव व फ्रेडरिक निल्सनने सातव्या मानांकित पेस व मायकल लोड्राचा 7-6, 7-6 ने पराभव केला. महेश भूपती-डॅनियल नेस्टरला निकोलस अलमाग्रो-ओलीवर मराचने 6-3, 6-3 असे हरवले.


डेव्हिड फेरर विजयी
पुरुष गटाच्या तिस-या फेरीतील इतर सामन्यात तिसरा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने 32 वा मानांकित इटलीच्या एफ. गोनिनीला 6-1, 7-5 ने पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.


चौथ्या फेरीत शारापोवा
मारिया शारापोवाने आपल्याच देशाच्या एलिना वेस्निनाला 6-4, 6-2 ने पराभूत करून महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिचा सामना आता क्लारा जाकोपालोवाशी होईल.