आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MMA Fighter Garret Knocks Out In One Second Latest News In Marathi

जगातील सर्वांत छोटा सामना, एका सेकंदात खेळ समाप्‍त!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वॉरिअर्स चॅलेंज कुस्‍ती दरम्‍यान एक अनोख विक्रम प्रस्‍तापीत झाला. माईक गॅरेटने आपल्‍या प्रतिद्वंदी खेळाडू सॅम हॅरॉनला एका सेकंदात पराभूत केले.

सामन्‍याच्‍या सुरुवातीलाच माईक गॅरेटने सॅम हॅरॉनवर जोरदार हल्‍ला चढविला. या हल्‍ल्‍याचा प्रतिकार हॅरॉनला करताच आला नाही. 75 किलो वजनी गटात खेळल्‍या गेलेल्‍या या सामन्‍यामध्‍ये गॅरेटने 21 वर्षीय हॅरॉनच्‍या छातीमध्‍ये लाथ मारली. त्‍याचा प्रहार एवढा जबरदस्‍त होता, की हॅरॉन जागेवरुन उठूच शकला नाही. त्‍यामुळे गॅरेटला विजयी घोषित करण्‍यात आहे. हा सामना फक्‍त 1.13 सेकंदामध्‍ये पार पडला. एवढया कमी वेळेत सामना जिंकण्‍याची ही पहिलीच वेळ आहे.

यापूर्वी पाच सेकंदात सामना जिंकण्‍याचा विक्रम कोरी कॉन्‍वे याच्‍या नावावर होता. त्‍याने एजे लिवोन ला पाच सेकंदात पराभूत केले होते.

विजयानंतर प्रसिध्‍दीमाध्‍यमांना प्रति्क्रिया देताना गॅरेटने सांगितले, की '' कुस्‍तीच्‍या आखाड्यात उतरल्‍यानंतर मी एकच ठरविले होते,की प्रतिस्‍पर्धकावर जोरदार प्रहार करायचा, त्‍याला सावरण्‍याची संधीच मिळता कामा नये.''

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा छायाचित्रे...