आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार रेसलरच्या 15 महिन्याच्या बाळाला 72 वर्षाच्या दारूड्या आजीने उडवले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिता मार्कससोबत खेळताना 15 महिन्याचा लियाम. लियामचा हा फोटो 16 जुलै, 2016 रोजीचा आहे. इन्सेटमध्ये टक्कर मारणारी दारूडी आजी. - Divya Marathi
पिता मार्कससोबत खेळताना 15 महिन्याचा लियाम. लियामचा हा फोटो 16 जुलै, 2016 रोजीचा आहे. इन्सेटमध्ये टक्कर मारणारी दारूडी आजी.
कॅलिफोर्निया- अमेरिकन MMA फायटर मार्कस कोवालच्या 15 महिन्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मार्कसने मुलाच्या हाताला झालेल्या दुखापतीचा फोटो शेअर करीत मंगळवारी रात्री गुडबॉय म्हटले. अपघातानंतर त्याचा मुलगा लाईफ सपोर्ट सिस्टमवर होता. अपघात करणारी निघाली 72 वर्षाची दारूडी आजी...
- शनिवारी मार्शल आर्ट फायटर मार्कलच्या 15 महिन्याचा मुलगा लियामला कारने धडक दिली होती.
- घटनेवेळी लियामची 15 वर्षाची मावशी प्रेम त्याला फिरवत होती. त्याचवेळी लियामला जोराची धडक बसली.
- लियामला फिरवत असलेली प्रेम ही लियामची आई मिशेल एडरची बहिण आहे.
- 72 वर्षाची महिला डोना मेरी हिगिन्सच्या कारने त्याला उडवले. त्यावेळी डोना ड्रंक अॅंड ड्राईव करत होती.
- कॅलिफोर्नियात झालेल्या या जबरदस्त अपघातानंतर डोना पळून गेली होती.
- मात्र, पोलिसांनी तिला काही वेळात शोधले व पकडून अटक केली. तिच्यावर ड्रंक अॅंड ड्राईव आणि हिट अॅंड रन ची केस दाखल केली आहे.
- मात्र, महिलेला जामीन मिळाला आहे. मात्र पोलिसांनी तिच्यावर विविध गुन्हे व कलमे लावली आहेत.
तीन दिवस दिली लढाई, बॉडी पार्ट दान करणार-
- या घटनेनंतर गंभीर जखमी झालेला लियामला तीन दिवस हॉस्पिटलमध्ये होता.
- अखेर मंगळवारी रात्री त्याला डॉक्टर्सनी ब्रेन डेड घोषित करीत लाईफ सपोर्ट सिस्टम काढून टाकले.
- मार्कसने सोमवारीच लियामचे बॉडी पार्ट्स डोनेट करण्याचा निर्णय घेतला होता.
- यानंतर त्याला हजारो फोन कॉल्स आले. एक दिवसानंतर या घटनेने त्रास होऊ लागल्याने त्याने आपला फोन बंद करून टाकला.
- मार्कसने कहा, ‘आम्ही आता खूप काही सहन करीत आहोत. अशा वेळी मी फोन कॉल्स घेऊ शकत नाही.’
शेअर केले हे इमोशनल मॅसेज-
- एक्सीडेंटनंतर मार्कसने सोशल मीडियात या घटनेशी संबंधित अनेक इमोशनल मॅसेज शेयर केले.
- त्याने लिहले, ‘एक तासापूर्वी माझ्या मुलाला ब्रेन डेड घोषित केले गेले आहे. त्याने आयुष्याची लढाई लढली.’
- ‘एक वेळ तो आपला जीव गमावून बसला होता मात्र डॉक्टरांनी त्याला वाचवले. तो लिटल फायटर आहे.’
- ‘त्याचे ह्दय अजूनही धडधडते आहे. मात्र मेंदू काम करीत नाही. मी संपूर्ण उद्ध्वस्त झालोय. सर्व काही संपलेय असे मला वाटतेय. मात्र आम्ही यातून बाहेर येऊ.’
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 15 महिन्याच्या लियामचे त्याच्या फॅमिलीसोबतचे फोटो...सोबतच मार्कसचे इमोशनल मॅसेज जे मुलाच्या अपघातानंतर केलेत शेयर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...