आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- तब्बल 28 वर्षे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) अध्यक्षपदावर राहिलेल्या शरद पवार यांनी देशातील क्रीडा क्षेत्रातील मतप्रवाहाचा आदर करून या पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला. येत्या 26 मार्च रोजी पुण्यात होणार्या एमओए निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता संपली. अध्यक्षपदासाठी जसा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला नाही.
शरद पवार व अन्य ज्येष्ठ राजकारणी व पदाधिकार्यांनी आचारसंहिता मान्य करून संघटनेच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असला तरीही गेली 8 वर्षे महासचिवपदावर असलेल्या बाळासाहेब लांडगे यांना मात्र मोह आवरता आला नाही. एमओएच्या घटनेत पदाधिकार्यांसाठीची कालर्मयादा निश्चित करण्यात आली नसल्याचा आधार घेत लांडगे यांनी अर्ज दाखल केला. त्या पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक योग्य उमेदवारांनी मतांच्या राजकारणाचा व विभागणीचा धसका घेऊन अर्ज भरले नाहीत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनसारख्या फारशा कार्यरत नसलेल्या संघटनेसाठी सर्वस्व पणास लावून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यापेक्षा काहींनी त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. काहींनी जेथे जागा रिक्त आहे, तेथे अर्ज भरण्याचा सोयीस्कर निर्णय घेतला. त्यामुळे एमओएची 26 मार्च रोजी होणारी निवडणूक वादळी ठरणार, हा अंदाज फोल ठरला.
कलमाडीचीही माघार- 'राष्ट्रकुल' घोटाळ्यापासून वादाच्या भोवर्यात सापडलेल्या सुरेश कलमाडी यांनीही उपाध्यक्षपदाचा 8 वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा संघटनेत येण्यात रस दाखवला नाही. फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही 8 वर्षे पूर्ण झाल्यामुळे अर्ज दाखल केला नाही. सतीश प्रधान यांनीही 8 वर्षे उपाध्यक्षपद भूषवल्यामुळे पुन्हा अर्ज दाखल केला नाही. 4 वर्षे उपाध्यक्षपदावर असलेल्या अशोक पंडित यांनी मात्र उपाध्यक्षपदासाठी पुन्हा अर्ज भरला.
बड्या क्रीडा संघटकांनी अंग काढले- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची सध्याची भूमिका आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राची भावना यांचा आदर करून शरद पवार, सुरेश कलमाडी आणि प्रफुल्ल पटेल या तीन देशातील बड्या क्रीडा संघटकांनी या निवडणुकीतून अंग काढून घेतले.
अजित पवार यांनी कबड्डी, कुस्ती व खो-खोसाठी मदतीचा हात पुढे करून स्वत:ची नवी ओळख महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात निर्माण केली आहे. अजित पवारांसारख्या तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता असणार्या व्यक्तीच्या हाती एमओएची सूत्रे आली आहेत.
शूटिंग, बॅडमिंटन, बॉकिंसग या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील महाराष्ट्राच्या प्रतिनिधींसह नव्या अध्यक्षांना नव्या योजना आखता येतील का ? .हे आव्हान नव्या अध्यक्षांपुढे असतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.