आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohali Test Debut Cricketer Shikhar Dhawan Personal Life

OMG ! शिखर धवनच्‍या पर्सनल-लाईफमध्‍ये हरभजनने केले होते \'MATCH FIXING\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍लीचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनवरही लेडी लकचा प्रभाव पडल्‍याचे दिसून येते. धवनने गेल्‍यावर्षी ऑस्‍ट्रेलियामध्‍ये राहणा-या आयशा मुखर्जीशी विवाह केला. विशेष म्‍हणजे धवनने कसोटी पर्दापणातच आपल्‍या सासरच्‍या टीमविरूद्ध जबरदस्‍त खेळाचे प्रदर्शन केले.

आयशाशी लग्‍न केल्‍यापासून त्‍याच्‍या क्रिकेटच्‍या करीअरनेही वेग घेतला आहे. निवडसमितीने वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर सारख्‍या दिग्‍गज क्रिकेटपटूंना बाहेरचा रस्‍ता दाखवून मोहाली कसोटीसाठी धवनची निवड केली.

शिखर धवनची लव्‍ह स्‍टोरीही जरा हटके आहे. आयशाशी त्‍याची भेट होणे हा एक योगायोगाच भाग होता. या 'मॅच फिक्सिंग'मध्‍ये सर्वात मोठा हात होता तो फिरकीपटू हरभजन सिंगचा. भज्‍जी, आयशा आणि शिखर हे एकमेकांचे कॉमन मित्र होते. हरभजनच्‍या माध्‍यमातून या दोघांची पहिल्‍यांदा भेट झाली होती.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या टीम इंडियाचा 'नवा स्‍टार' शिखर धवनच्‍या लव्‍ह स्‍टोरीविषयी...