आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीणाबरोबर अफेअर-सनाशी लग्‍न, जाणून घ्‍या या फिक्‍सरची वादग्रस्‍त लाईफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटला कलंकित करणारे स्‍पॉट फिक्सिंग प्रकरण पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहे. एकीकडे दिल्‍ली पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेचा दिवंगत माजी कर्णधार हॅन्‍सी क्रोनिएसमवेत इतर आरोपींविरोधात 13 वर्षांनंतर चार्जशीट दाखल केले आहे. तर दुसरीकडे पाकिस्‍तानचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद आसिफने पीसीबीसमोर आपण 2010 साली स्‍पॉट फिक्सिंग केल्‍याचे कबूल केले आहे.

आसिफने पीसीबीच्‍या एका अधिका-यासमोर हे मान्‍य केले आहे. इंग्‍लंडविरोधात 2010 साली लॉर्ड्समध्‍ये खेळण्‍यात आलेल्‍या कसोटीत स्‍पॉट फिक्सिंग केले होते. आसिफने आपल्‍या या कृत्‍याची जाहीर माफी मागितली आहे.

आसिफने केवळ 22 कसोटीत 100 विकेट घेऊन आपली प्रतिभा सा-या जगाला दाखवून दिली होती. मात्र, त्‍याला यश पचवता आले नाही.

वीणा मलिकबरोबरील अफेअर, प्रतिबंधित औषधांचे सेवनसारख्‍या वादांबरोबर आसिफ स्‍पॉटफि‍क्सिंगमध्‍येही सामील झाला होता. पुढच्‍या फोटोला क्लिक करून जाणून घ्‍या या पाकिस्‍तानी क्रिकेटमधील सर्वात मोठया फिक्‍सरचे वादग्रस्‍त जीवन...