नवी दिल्ली - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमीने जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. त्याने कोलकाता येथील मॉडेल हसीन जेहानसोबत विवाह केला. शमी आणि जेहानचे रिसेप्शन मुरादाबादच्या दिल्ली रोडवरील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शमी व जेहानने एक महिन्यापूर्वीच विवाह केला.
आयपीएलदरम्यान शमी जेहानला यूएईला घेऊन गेला होता. त्याने जेहानसोबतची छायाचित्रे
ट्विटरवर पोस्ट केली होती. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही आमंत्रित केले होते. त्याच्यापैकी कोणीही लग्नासाठी आले नाही. शमीने 2013 मध्ये वनडे करिअरला सुरुवात केली. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिली कसोटी खेळली. दोन्ही प्रकारात शमीच्या गोलंदाजीचे सर्वांनी कौतुक केले.
शमी सुपरफास्ट
टीम इंडियाचे नव्या पिढीचे वेगवान गोलंदाज खासगी जीवनातही अग्रेसर आहेत. याचे उदाहरण म्हणजे शमी. जहीर खान व इरफान पठाणने अनुक्रमे 2000 आणि 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली. आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू जीवनात एकटेच आहेत. दुसरीकडे त्यांचे ज्युनियर वैयक्तिक जीवनात त्यांच्या पुढे निघून गेले आहेत. गतवर्षी बालाजीने प्रियासोबत विवाह केला.
अगोदर साखरपुडा
शमीचा साखरपुडा अगोदर झाला होता. सात महिन्यांपूर्वी एका तरुणीचा फोटो
फेसबुकवर जाहीर झाला होता. त्या वेळी सर्वांनी अंदाज लावत ती युवती त्याची जीवनसाथी बनेल, अशी चर्चा होती.
बहिणीचा विवाह पक्का
येत्या 13 जून रोजी शमीच्या बहिणीचा विवाह ठरला आहे. यापूर्वी 6 जून रोजी त्याने रिसेप्शन दिले. या दोघांच्या विवाहासाठी एक त्र लग्नपत्रिका छापल्या होत्या. शमीच्या मार्गदर्शनाखाली रिसेप्शनची व्यवस्था करण्यात आली होती.